इतिहासातील थरारक अध्याय मोठ्या पडद्यावर

रणपति शिवराय स्वारी आग्रा’ 6 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात

    दिनांक :30-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Chhatrapati Shivaji Maharaj Agra visit छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंग ‘आग्रा स्वारी’ आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित भव्य चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला हा चित्रपट महाराजांच्या शौर्य, चातुर्य आणि असामान्य नेतृत्वगुणांचे सजीव दर्शन घडवेल अशी अपेक्षा आहे.
 

Chhatrapati Shivaji Maharaj Agra visit 
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक संकटांना तोंड दिले. त्यांच्या जीवनातील आग्रा भेट हा प्रसंग त्यांचा स्वाभिमान, देशभक्ती आणि सूझबूझ यांचा उत्तम नमुना मानला जातो. चित्रपटात आणि त्या ऐतिहासिक प्रसंगात, औरंगजेबासारख्या अत्यंत दगाबाज आणि कपटी शत्रूशी महाराजांनी कसा सामना केला, तसेच त्यांच्या शौर्याबरोबरच नीट नियोजन व बुद्धिमत्तेवर कसा विजय मिळवला, याचे थरारक चित्रण पाहायला मिळेल.
चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी) आणि मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा आहेत. संगीत वितरण पॅनोरमा म्युझिककडे आहे.
 
 
चित्रपटात मृणाल Chhatrapati Shivaji Maharaj Agra visit कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण आणि अनेक इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज आणि संजय करोले यांनी केले आहे. छायांकन संदीप शिंदे, संकलन सागर शिंदे व विनय शिंदे यांनी केले आहे. गीते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि दिग्पाल लांजेकर यांची असून संगीत अवधूत गांधी व मयूर राऊत यांच्याकडे आहे. पार्श्वसंगीत मयूर राऊत यांनी सजवले आहे.चित्रपटातले रंगभूषा, वेशभूषा, ध्वनी संयोजन, साहसदृश्ये व नृत्यदिग्दर्शन यांसह सर्व कलात्मक घटक उत्कृष्टरीत्या सादर करण्यात आले आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीतील नियोजन, शौर्य व रणनीती यांचे थरारक चित्रण प्रेक्षकांना ऐतिहासिक अनुभव देणार आहे.यंदाच्या हिवाळ्यात मराठी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. स्वराज्य स्थापनेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय नेतृत्वगुणांचे हे रुपेरी पडद्यावरचे साक्षात्कार पाहण्यासाठी चित्रपटप्रेमी आतुर आहेत.