दौंड
daud fake liquor factory दौंड तालुक्यातील सोनवडी, पांढरेवाडी आणि गार परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचूक आणि धडक कारवाई करत बनावट दारू बनवणाऱ्या ‘फिरती फॅक्टरी’चा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे ८५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार वाहने, दारू निर्मितीची यंत्रसामग्री, स्पिरीट तसेच मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू हस्तगत करण्यात आली आहे.
दौंड विभागाचे निरीक्षक daud fake liquor factory विजय रोकडे आणि दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरूक यांनी सांगितले की, या कारवाईत सुनील नगराळे (रा. धुळे), सोमनाथ नांदखिले (रा. गार, ता. दौंड) आणि विजय झगडे (रा. पांढरेवाडी, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीवर अंकुश आणण्यासाठी करण्यात आली.सोनवडी परिसरात आयशर टेम्पो (क्र. एमएच ०३ सीपी ९०९०) मध्ये सुरू असलेली बनावट दारूची ‘फिरती फॅक्टरी’ उद्ध्वस्त करण्यात आली. या ठिकाणी स्पिरीट, एक स्वयंचलित बॉटलिंग मशीन, देशी दारूच्या ९६ बाटल्या आणि विनालेबल ११० बाटल्या जप्त करण्यात आल्या. पांढरेवाडी येथे छापा टाकून ट्रॅक्टर आणि ह्युंदाई कारमधून होणारी अवैध दारू वाहतूक उघडकीस आणण्यात आली, तसेच देशी दारूच्या बाटल्या आणि वाहने जप्त केली गेली. गार परिसरात एका शेतातील वीटभट्टीजवळ लपवलेला मोठा बनावट दारूचा साठाही ताब्यात घेण्यात आला.
ही संयुक्त कारवाई राज्य daud fake liquor factory उत्पादन शुल्क विभाग, दौंडचे निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक मयूर गाडे तसेच मुंबई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस.आर. गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, संकेत वाजे, सौरभ देवकर, सोपान टोंपे, दत्तात्रय साळुंके आणि केशव वामने सक्रिय सहभाग घेतला.पुढील तपास अद्याप सुरू असून, या प्रकरणात आणखी गुन्हेगार आणि बनावट दारूच्या साखळीचा शोध घेण्यात येत आहे.