दीक्षाभूमीचा विकास हाेणार सिंगापूर-दुबईच्या धर्तीवर!

समाज कल्याण विभागाची माहिती

    दिनांक :30-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Development of Deeksha Bhoomi दीक्षाभूमीचा विकास हा सिंगापूर आणि दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या धर्तीवर करण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण निर्देश सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिले आहेत. या विकासकामांसाठी ’ग्लाेबल टेंडर’ प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला समाज कल्याण उपायुक्तांनी दिली. दीक्षाभूमीच्या बेसमेंट पार्किंगबाबत प्रतिज्ञापत्राव्दारे भूमिका स्पष्ट करा, असे आदेश न्यायालयाने राज्य शासनासह नासुप्र आणि नागपूर महानगर विकास प्राधिकरण यांना दिले हाेते. या प्रकरणी न्यायालयाने दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात प्रशासकीय मान्यता देण्याबाबत माहिती देण्यासाठी राज्य शासनाला येत्या 3 ेबु्रवारीपर्यंत अवधी दिला आहे. न्या.अनिल किलाेर आणि न्या. राज वाकाेडे यांनी प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्याबाबत माहिती सादर करण्यास सांगितले आहे.
 
 

Deeksha Bhoomi 
 
ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने आता हालचाली वेगवान केल्या आहेत. दीक्षाभूमी येथील विकासकामांबाबत ’डिझाईन असाेसिएट आयएनसी ’ ने सादर केलेल्या 4 पर्यायी नकाशांपैकी एका सर्वाेत्तम नकाशाची सवार्नुमते निवड करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत. नासुप्र , महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वय राखून हा विकास आराखडा अंतिम करावा. समाज कल्याण विभागाचे नागपूर प्रादेशिक उपायुक्तांनी एनएमआरडीएच्या अधीक्षकांना हे पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या दीक्षाभूमी विकास प्रकल्पाचा मार्ग आता माेकळा झाला असून, लवकरच नवीन आराखड्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात हाेण्याची शक्यता आहे. दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी अ‍ॅड. नारनवरे यांनी 2018 मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. नासुप्रर्ते अ‍ॅड. गिरीश कुंटे, सरकारर्ते अ‍ॅड. नितीन राव यांनी बाजू मांडली.
 
 
 
मूळ स्तूपाला धक्का न लावता विकास
नुकत्याच झालेल्या एका बैठकीत एनएमआरडीएच्या आयुक्तांनी विकास आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी मंत्र्यांनी स्पष्ट केले की, दीक्षाभूमी हे काेट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असल्याने, येथील कामे अत्यंत संवेदनशीलपणे केली जावीत. मुख्य म्हणजे, मूळ स्तूपाला काेणताही धक्का न लावता परिसराचे साैंदर्यीकरण करण्याचे आदेश देण्यात आलेत.
 
ग्लाेबल टेंडर
जागतिक दजार्चे आर्किटेक्ट आणि कंपन्यांना या कामात सामावून घेण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा काढल्या जाणार आहेत. सिंगापूर आणि दुबई येथील वास्तुकलेचा दर्जा लक्षात घेऊन येथील लँडस्केपिंग, पाथ-वे, आणि साऊंड-लाईटिंग थीम तयार केली जाईल. कामाला गती देण्यासाठी तातडीने ’रिक्वेस्ट ाॅर प्रपाेजल’ मागवण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दीक्षाभूमीच्या परिसरात भविष्यात पर्यटकांसाठी आणि अनुयायांसाठी जागतिक दर्जाच्या साेयीसुविधा उपलब्ध हाेणार आहेत.