‘क्रांतीज्योती’ ते स्टॅलिन...फरक आहेच!

    दिनांक :30-Jan-2026
Total Views |
वेध.....
marathi language आता लवकरच मराठी भाषा दिवस येईल, अनेक लोक मराठीचा उदो उदो करतील. पण, पुन्हा स्थिती ‘जैसे थे’च राहील. मराठीचा विषय येतो तेव्हा कायम एक प्रश्न पडतो की, हा आग्रह राज्य म्हणून मराठी भाषेचा आहे की मातृभाषा म्हणून आहे. अगदी शास्त्रीय अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, मातृभाषेतून झालेले प्राथमिक शिक्षण मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी अतिशय पोषक ठरते. एकदा मेंदूचा विकास नीट झाला की तुम्ही कोणतीही भाषा तितक्याच सक्षमपणे शिकू शकता. असे असूनही आजदेखील भाषेचा संबंध अस्मिता किंवा अशा शास्त्रीय मुद्यांशी न जोडता प्रांतवादाशी किंवा राजकारणाशी का जोडला जातो, हा प्रश्नच आहे.
 
 

marathi divas 
 
 
नुकताच मराठीत एक चांगला चित्रपट आलाय् ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’. शोकांतिकेची सुरुवात इथून आहे की, मराठी चित्रपट कोणता आलाय, कोणता येणार आहे, हेदेखील आपल्या मराठीजनांना फारसे माहिती नसते. असो. पण, या चित्रपटाने पुन्हा एकदा मराठी शाळांचा विषय ऐरणीवर आणला. महाराष्ट्रात आहात तर मराठी बोला वगैरे वाक्य आपण राजकीय नेत्यांच्या तोंडी ऐकतो. ते त्यांच्या परीने राजकारण करतही असतील. एक मात्र खरे की महाराष्ट्रात असताना किमान मूळ मराठी लोकांनी तरी मराठीत बोलले पाहिजे.
सर्वात मोठा भ्रम म्हणजे, भाषेचा संबंध आपण आत्मविश्वासाशी आणि पर्यायाने प्रगतीशी जोडतो. लहानपणापासून कॉन्व्हेंटमध्ये शिकणाèया मुलांचा आत्मविश्वास नव्हे ‘कॉन्फिडन्स’ फारच चांगला असतो आणि त्या तुलनेत मराठी माध्यमात शिकलेली मुले नंतरच्या जीवनात उघडी पडतात. ‘क्रांतीज्योती’ने या समजाचाही उहापोह केला. प्राथमिक शिक्षण मराठीत घेतलेले अनेकजण आज विदेशात सक्षमपणे काम करताहेत. त्यांना संवाद प्रक्रियेत कोणतीही अडचण जात नाही. याचाच अर्थ, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्याने आत्मविश्वास कमी होतो, ही बाब तितकीशी जोरकस नाही. जे लोक असा दावा करत असतील त्यांनी मराठी नाही तर किमान एकच दक्षिणेतील उदाहरण पाहावे (कारण आपल्याला दुसèयाचं उदाहरण जास्त लवकर पटतं) डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांनी मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण घेतले होते आणि ते कायम मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पुरस्कार करायचे. ते आग्रहपूर्वक म्हणायचे, मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे.
एवढे सगळे असूनही आपण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणासाठी आजही कचरतो. एवढेच कशाला, जे नेते मराठीच्या मुद्यावरून राजकारण करतात त्यांची मुले केंद्रीय बोर्डाच्या मोठमोठाल्या इंग्रजी माध्यम शाळेत शिकतात. हा विरोधाभास कुठेतरी समाजाला बुचकाळ्यात टाकतो. पण, इथे एकच मुद्दा लक्षात ठेवावा की, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण कधीही नुकसान करत नाही. कारण आजकाल बालक मंदिरापासूनच इंग्रजी भाषा देखील शिकवली जाते. पूर्वी इंग्रजी भाषा पाचव्या वर्गापासून शिकवली जायची. त्यामुळे मराठी माध्यमात शिकल्याने इंग्रजीचा गंधच राहणार नाही, असे म्हणण्याला वावच नाही. त्यातही आता राज्य सरकारने आपली मुले पुढील स्पर्धा परीक्षेत मागे पडू नये म्हणून सीबीएसईच्या धर्तीवर राज्यातील शिक्षण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे स्टेट बोर्डात टाकले तर आपले मूल मागे पडेल, ही धास्ती उरण्याचीही गरज नाही.
दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा खर्चाचा. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये असणारे भरमसाठ शुल्क आणि मराठी शाळांचे शुल्क पाहिले तर कितीतरी कमी खर्चात आपलं मूल दहाव्या वर्गापर्यंत शिकू शकतं. याउलट, इंग्रजी माध्यमात मोठे शुल्क अगदी पहिल्या वर्गापासून सुरू होते आणि दरवर्षी त्यात वाढ होत जाते.marathi language म्हणजे आठ ते दहा लाख रुपये खर्च करून आपले मूल काय शिकले तर दहावी पास झाले! मग या बाबतीत लोक भावनिक मुद्दा आणतात की, आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी खर्चात तडजोड का करायची? तडजोड करूच नका. उलट, उरलेला पैसा त्याला एखादा क्रीडा प्रकार शिकवण्यासाठी किंवा कला आत्मसात करण्यासाठी खर्च करा. त्याने त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होईल. शेवटी एवढेच म्हणायचे आहे की, दक्षिणेकडील नेता स्टॅलिन जसा आपल्या भाषेचा अट्टहास करतो तसा नाही पण किमान आपली मराठी येणाèया प्रत्येक पिढीत योग्य रितीने संक्रमित होईल, एवढे तरी तिचे अस्तित्व आपण टिकवले पाहिजे. कारण आपल्याला भाषेचे राजकारण करायचे नाही तर भाषा जगावायची आहे, समृद्ध करायचीय....
सोनाली पवन ठेंगडी
7755938822