सुप्रिया सुळेंच्या 'त्या' क्लिपमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा, ट्रोलर्सचे लक्ष्य?

30 Jan 2026 11:12:53
बारामती,  
supriya-sule-viral-video उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात अकस्मात मृत्यू झाला. शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खंदक नेतृत्वाचे ठिकाण आणि लोकनेते म्हणून अजित पवारांकडेच पाहिले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठा धक्का बसला आहे.
 
supriya-sule-viral-video
 
२९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्याप्रतिष्ठान प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी देशभरातून मोठ्या संख्येने नेते आणि समर्थक उपस्थित होते. supriya-sule-viral-video दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर जमा झाला. अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात सुप्रिया सुळे पवार कुटुंबाचा आधार देताना दिसल्या. त्यांनी सुनैत्रा पवारांचा हात धरून त्यांना पार्थिवापर्यंत नेले, तसेच पार्थ आणि जय पवार यांनाही आधार दिला. एका व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे बसणाऱ्यांच्या रांगेत बदल करत मागील काही मुलींना पुढे बसण्याची सूचना करताना दिसल्या. यामुळे सोशल मीडियावर काही जणांनी संताप व्यक्त केला असून काहींनी त्यांना बॉस लेडीसारखे वागत असल्याचे म्हटले आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलिनीकरण आणि पक्षातील संतुलन राखणे यासाठी सुप्रिया सुळे महत्त्वाची भूमिका बजावू इच्छित आहेत. supriya-sule-viral-video पवार कुटुंबातल्या सर्व भावंडांमध्ये सुप्रिया सुळे या मोठ्या असल्याने, त्यांनी भावाच्या अकाली निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचे सांत्वन केले आणि अनेक ठिकाणी पुढाकार घेतला. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना पवार कुटुंबाचा आधारवड म्हणून कौतुक केले आहे. भावाच्या अकाली निधनाने पवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे; अशा कठीण प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी कुटुंब आणि पक्षाचे सांत्वन करत आपली जबाबदारी निभावली, असे दिसते.
Powered By Sangraha 9.0