सरकारने केला ब्लॉक! 'या' ॲपला तात्काळ मोबाईलमधून डिलीट करा

    दिनांक :31-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
winzo app गेमिंग ॲपच्या आड घेतले जाणारे साइबर फसवणूक प्रकरण समोर आल्यानंतर केंद्र सरकारने ‘विंजो’ ॲपवर बंदी घातली आहे. या ॲपच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या मोबाईलवरून फसवणूक करणारे एसएमएस पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळवले जात असल्याचे आढळून आले. ही माहिती केंद्रीय गृह मंत्रालयापर्यंत पोहोचल्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली.
 

winzo app  
केंद्रीय गृह मंत्रालय winzo app  आणि भारतीय साइबर क्राइम समन्वय केंद्र (I4C) यांनी अनेक तक्रारी मिळाल्यानंतर ॲपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या ॲपमुळे अनेक वापरकर्ते अनवधानाने साइबर गुन्हेगारांच्या नेटवर्कचा भाग बनत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले.अधिकार्यांच्या माहितीनुसार, ॲप डाउनलोड केल्यानंतर वापरकर्त्यांचा मोबाईल फसवणूक करण्यासाठी वापरला जाई, आणि त्यातून मोठ्या प्रमाणात एसएमएस पाठवले जात. या फसवणुकीद्वारे प्रतिदिन सुमारे 1.53 कोटी लोकांपर्यंत संदेश पोहोचत होते. लहान परंतु सतत मिळणाऱ्या पैशाच्या लालचात 1.53 लाखांहून अधिक वापरकर्ते अनवधानाने या गुन्ह्यात सहभागी झाले होते.याशिवाय, सरकारने ॲपच्या नियंत्रण केंद्राला ब्लॉक केले असून, या प्रकरणाशी संबंधित चार टेलीग्राम चॅनेल आणि 50 हून अधिक यूट्यूब व्हिडिओजवरही बंदी घालण्यात आली आहे. नोएडा पोलिसांनी देखील याॲपच्या दुरुपयोगाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती.गृह मंत्रालयाचे अधिकारी सांगतात की, अशा प्रकारच्या गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी केवळ अधिकृत ॲपचा वापर करावा आणि अनधिकृत लिंकवर क्लिक करण्यास टाळाटाळ करावी.