मुंबई,
Parineeti Chopra बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांच्यातील सोशल मीडियावरील ‘अनफॉलो’ प्रकरणाने चाहत्यांमध्ये गदारोळ निर्माण केला होता. परिणीतीने सायनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची बातमी समोर आल्यावर अनेकांनी अनुमान लावले होते की दोघींमध्ये वैयक्तिक वाद झाला आहे.
तथापि, नुकतेच सायना नेहवालने या प्रकरणावर आपले मत व्यक्त करत धक्कादायक खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये सायनाने स्पष्ट केले की, परिणीतीसोबत त्यांना कधीच ‘जवळची मैत्री’ नव्हती. सायनाने सांगितले, "आमच्यात कधीही मैत्रीसारखे नाते निर्माण झालेले नाही. जेव्हा परिणीती माझ्या बायोपिकसाठी काम करत होती, तेव्हा आमचे संवाद फक्त व्यावसायिक स्वरूपाचे होते. तिने माझ्या आयुष्याबद्दल आणि संघर्षाबद्दल जाणून घेण्यासाठी माझी भेट घेतली होती, पण वैयक्तिक मैत्री आम्ही कधीच साधले नाही."
सायनाने सोशल Parineeti Chopra मीडियावरील या अनफॉलो प्रकरणावर आपले मत मोकळेपणाने व्यक्त करत म्हटले की, "माझे आयुष्य ट्रेनिंग, टूर्नामेंट्स आणि इव्हेंट्समध्ये इतके व्यस्त आहे की, कोण मला फॉलो करतंय किंवा अनफॉलो करतंय, याकडे लक्ष देण्याची वेळच मला नाही." तसेच, दोघी कधीही एकत्र जेवायला गेल्या नाहीत, असेही सायनाने नमूद केले.२०१२ मध्ये आलेल्या ‘सायना’ या चित्रपटात परिणीतीने सायनाची भूमिका साकारली होती आणि तिच्या कामाचे कौतुक प्रचंड प्रमाणात झाले होते. सायना आणि परिणीती यांच्यातील अनफॉलो प्रकरणाबाबत झालेली गप्पागोष्टी फेटाळून सायनाने स्पष्ट केले की, दोघींमध्ये कोणताही वाद किंवा वैयक्तिक तणाव नाही.या खुलाश्यानंतर चाहत्यांना आता दोघींमध्ये कोणताही गैरसमज नसल्याचे समजून घेता येते.