आयुक्तांनी केली शासकीय मुद्रणालयात मतपत्रांची पाहणी

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
नागपूर,
press-ballot-paper-inspection : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनवर लावण्यासाठी मतपत्रांची छपाई नागपुरातील शासकीय मुद्रणालय येथे केली जात असून, या ठिकाणी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी रविवारी भेट दिली.
 

NMC 
 
महानगरपालिकेच्या ३८ १५१ जागेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, निवडणुकीसाठी ९९२ उमेदवार रिंगणात आहे. मनपाच्या झोन निहाय प्रत्येक प्रभागासाठी मतपत्रांची छपाई होत आहे. यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी चौधरी यांनी शासकीय मुद्रणालय येथे भेटी दरम्यान अधिकार्‍यांशी चर्चा करीत संबधित कामासंदर्भात निर्देश देखील प्रसंगी मनपा उपायुक्त आणि निवडणूक प्रमुख निर्भय जैन, सहायक आयुक्त श्याम कापसे, कार्यकारी अभियंता सिंग, निवडणूकनिर्णय अधिकारी इंदिरा चौधरी, अमोल कुंभार, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम आणि शासकीय मुद्रणालयचे सहायक व्यस्थापक विनोद बोंधले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.