हडस प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

04 Jan 2026 12:28:20
नागपूर,
Hadas Primary School लिबरल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित हडस प्रायमरी स्कूल (स्टेट बोर्ड, इंग्लिश मीडियम), रामदास पेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती (बालिका दिन) उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादनाने केली. यानंतर वर्ग ८ ची अनुश्री मानकर हिने सावित्रीबाईंच्या जीवनावर माहितीपूर्ण भाषण केले. वर्ग ८ ची तन्वी तिजारे हिने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित स्वरचित कवितेचे सादरीकरण केले, तर वर्ग ९ च्या जतीन निमरडकर याने सावित्रीबाईंनी रचलेल्या कवितेचे वाचन केले.

hadas 
 
 
वर्ग ४ च्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंवर आधारित ओव्या सादर केल्या.  Hadas Primary School यासाठी संगीत शिक्षिका अनुजा देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच वर्ग ४ च्या समर्थ कोरडे याने स्त्री शिक्षण विषयक सुविचार व उक्तींचे लेखन सादर केले.यावेळी मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील मूल्ये व आदर्श विद्यार्थ्यांना समजावून सांगत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका . सुरभी संगमनेरकर व वैदेही अराणके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
सौजन्य:गजानन रानडे,संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0