'या' अभिनेत्यावर 5 कोटींच्या फसवणुकीचा गंभीर आरोप

04 Jan 2026 12:32:35
मुंबई,
Jay Dudhane fraud case बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील उपविजेता आणि अभिनेता जय दुधाणे सध्या गंभीर वादात सापडला आहे. ठाणे पोलिसांनी मुंबई विामनतळ परिसरातून जय दुधाणेला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर सुमारे 5 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जयने बनावट कागदपत्र तयार करून ती अनेक लोकांना विकल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे अनेकांचा आर्थिक नुकसान झाले आहे.
 

मुंबई, Jay Dudhane fraud case  
काय आहे प्रकरण?
माहितीप्रमाणे, जयने काही मालमत्तांचे बनावट कागद तयार करून विक्री केली आणि या बेकायदेशीर व्यवहारामुळे अनेक खरेदीदारांचे पैसे फसवले गेले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जयच्या कुटुंबातील सदस्यांनाही – आई, बहीण, आजी, आजोबा – तपासासाठी बोलावण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरु असून, या फसवणुकीमागील कट, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
 
 
विशेष म्हणजे, Jay Dudhane fraud case अटक झाल्यानंतर ही बातमी मनोरंजन विश्वात मोठा खळबळ उडवून दिली आहे कारण जय दुधाणे फक्त १० दिवसांपूर्वीच वैवाहिक बंधनात अडकले होते. लग्नानंतर लगेचच अटकेची कारवाई झाल्याने चाहत्यांमध्ये धक्काच बसला आहे.जय दुधाणे बिग बॉस मराठी ३ च्या माध्यमातून घराघरात पोहोचला होता आणि त्याचा अभिनय चाहत्यांना आवडला. त्याने 'स्प्लिट्सविला'च्या १३व्या पर्वातही विजयी ठरल्याचे गौरव प्राप्त केले आहे. तसेच स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती, मात्र वैयक्तिक कारणास्तव काही महिन्यांनंतर त्याने मालिका सोडली होती.सध्या जय किंवा त्याच्या टीमकडून या प्रकरणासंदर्भात कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. या घटनेमुळे जय दुधाणेच्या करिअरवर येणाऱ्या परिणामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे पोलिस प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत आणि पुढील कारवाई कशी असेल, यावर मनोरंजन विश्वातील चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
Powered By Sangraha 9.0