आव्हान दिले, ठिकाण सांगितले; आणि अमेरिकेने थेट मादुरो यांना उचलून नेले, VIDEO

04 Jan 2026 09:48:39
वॉशिंग्टन,  
nicolas-maduro-arrest व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी एका जाहीर सभेतून अमेरिकेला खुलेआम आव्हान दिले होते. मंचावरून संतापात बोलताना त्यांनी अमेरिकेला ‘भित्रा’ असे संबोधले आणि थेट आपले ठिकाण जाहीर करत, “या, मी मिराफ्लोरेसमध्ये आहे, इथेच तुमची वाट पाहतोय,” असे म्हटले होते. मात्र, याच आव्हानानंतर काही दिवसांतच अमेरिकेच्या सैन्याने कारवाई करत मादुरो यांना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

nicolas-maduro-arrest 
 
व्हाइट हाऊसकडून या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मादुरो अमेरिकेला आव्हान देताना दिसतात. nicolas-maduro-arrest ते म्हणताना दिसतात की, “मला पकडायचे असेल तर या, मी इथेच आहे. उशीर करू नका, भित्र्यांनो!” यानंतर व्हिडीओमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो शांत आणि थंड स्वरात प्रतिक्रिया देताना दिसतात. “आता तरी तुम्हाला समजले असेल,” असे ते म्हणतात. पुढील दृश्यात मादुरो ताब्यात घेतले गेल्याचा फोटो दाखवण्यात आला असून, शेवटी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हसताना दिसतात.
हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, अमेरिकेच्या दाव्यानुसार शनिवारी त्यांच्या सैन्याने थेट व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये प्रवेश करत मादुरो यांना त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेतले. या घटनेनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. nicolas-maduro-arrest किम जेंट्री नावाच्या एका एक्स (माजी ट्विटर) युजरने लिहिले की, “आम्हाला औपचारिक निमंत्रण मिळाले, याचा आनंद आहे.” तर दुसऱ्या एका युजरने उपरोधिक टिप्पणी करत म्हटले की, “व्हाइट हाऊसकडून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.” या संपूर्ण प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून, व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0