नागपूर,
teeli-chaturthi : रेल्वे स्टेशन मार्गावरील प्राचीन स्वयंभू गणेश टेकडी मंदिरात यंदा दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तीळी चतुर्थी निमित्त निमित्त मंगळवार ६ जानेवारीला गणेश टेकडी मंदिरात भक्तांकरीता ९०० किलो गुळाच्या रेवडीचा प्रसाद वितरीत केल्या जाणार असल्याची माहिती श्री गणेश टेकडीचे अध्यक्ष श्रीराम कुळकर्णी, सचिव दिलीप शहाकार यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी अरुण व्यास, विकास लिमये आदी उपस्थि होते.
पौषातील तीळी चतुर्थी निमित्त गणेश मंदिर टेकडी येथे दरवर्षीफार मोठया संख्येने भाविक दर्शनाला येतात. यामुळे सीताबर्डी भागाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. तीळी चतुर्थीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता संस्थेतर्फे विशेष व्यवस्था आली आहे. मुख्यत: मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून फुलांची सजावट करण्यात आली आहे. संस्थेतर्फे ७५० किलोचे चांदीचे गर्भगृह तयार करण्यात आले आहे.
भाविकांना ९०० किलो गुळाच्या रेवडीचा प्रसाद वितरीत केल्या जाणार आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथक राहणार आहे. सर्व भक्तांना सुरळीत दर्शन व्हावे याकरीता ५०० स्वयंसेवकांची मदत आली आहे.
पहाटे ४ वाजता मंगल महापूजा व आरती अजय संचेती यांच्या शुभ हस्ते होईल. मंदिरातील सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेने ६५, सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावले असून अपंग रूग्ण, वृध्द व गरोदर महिला, अश्या भाविकांसाठी ई-रिक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.