सावित्रीच्या विचारांचा चिमुकल्याद्वारे जागर

04 Jan 2026 18:02:09
मानोरा,
Savitribai Phule thoughts, तालुक्यातील ईंझोरी येथील गांधी चौकात शालेय विद्यार्थ्यांनी नाटिका, भारुड, एकांकिका, पत्रवाचन अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांमधून म. ज्योतिबाफुले व सावित्रीबाई फुले यांचे मानवतावादी विचार गावकर्‍यांसमोर मांडले.
 

Savitribai Phule thoughts, 
सावित्रीबाईंनी ज्योतिबास लिहिलेले पत्र स्वराज दिघडे याने वाचून दाखविले. तर अंधश्रध्देवरील विनोदी भारुडाचे प्रभावी सादरीकरण श्रुती लवंगे, वैभवी बोरकर, प्राची गावंडे, दामिनी इंगळे, अनन्या राठोड यांनी केले. यावेळी खोटारवाडीची शाळा तसेच फुले साहेब शाळेत येतात तेव्हा या आजच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रकाश टाकणार्‍या नाटिका, एकांकिका व भाषणे असे विविध प्रकार सादर करण्यात आले. त्यामध्ये गुंजन ढोक, श्रुती, श्रीपाद, खुशी राऊत, कुणाल दिघडे, संस्कृती इंगळे, श्रीयांश व अभिरा जयस्वाल, राशी व वैष्णवी बावणे, समृध्दी मेसरे, प्रथमेश भोजापुरे, जानवी धोंडे, भाविका, गौरी राठोड, नाविन्या आरेकर या चिमुकल्यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन गोपाली दिघडे, साक्षी मोजरकार व जगदीश आरेकर यांनी केले. प्रास्ताविक राजकुमार दिघडे यांनी केले. आभार शितल गावंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नैतिक आसावा, रामराव गावंडे, कैलास डोंगरे, गणेश भोपळे, पंकज राठोड, नारायण गावंडे व अन्य गावकर्‍यांनी प्रयत्न केले.
Powered By Sangraha 9.0