मुंबई,
anil kapoor nayak sequel 2026 बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट साकारले आहेत, परंतु त्यांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक म्हणजे २००१ साली प्रदर्शित झालेला “नायक: द रिअल हिरो”. राजकीय थ्रिलर असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर आपली ठसठशीत छाप सोडत आहे. २०२६ मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांचे सिक्वेल येत आहेत, त्यात आता “नायक”च्या सिक्वेलची चर्चा प्रेक्षकांत उत्सुकता निर्माण करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “सनम तेरी कसम” (२०१६) चे निर्माता दीपक मुकुट यांच्याकडे मूळ “नायक” चित्रपटाचे हक्क होते. वृत्त असे आहे की अनिल कपूर यांनी हे हक्क खरेदी केले असून आता त्यांनी या चित्रपटाचा सिक्वेल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट जवळपास २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची शक्यता आहे.
‘नायक: द रिअल हिरो’ या चित्रपटात anil kapoor nayak sequel 2026 अनिल कपूरसोबत राणी मुखर्जी आणि अमरीश पुरी यांची प्रमुख भूमिका होती. एस. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्या १९९९ च्या तमिळ चित्रपट ‘मुधलवन’ चा रिमेक होता. चित्रपटाला सुरुवातीला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, पण हळूहळू प्रेक्षकांच्या मनात घर करून, त्याला कल्ट चित्रपटाचा दर्जा मिळाला. २४ वर्षांनंतरही तो प्रेक्षकांच्या लक्षात ताजेतवाने राहतो.चित्रपटात एका निर्भय पत्रकाराची कथा सांगण्यात आली होती, जो एका दिवसासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो. या एका दिवसात तो अनेक धाडसी निर्णय घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवतो. २४ व्या वर्धापन दिनानिमित्त अनिल कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटातील अनेक आठवणीतले फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.अनिल कपूरच्या या निर्णयामुळे “नायक”च्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सिक्वेल कधी आणि कशा स्वरूपात येईल, याची प्रतीक्षा सुरू झाली आहे.