ढाका,
bangladesh-bairagi-murder बांग्लादेशातील जशोर जिल्ह्यातील मणिरामपूरमध्ये हिंदू युवक राणा प्रताप बैरागी याची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी बैरागीवर गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
(धार्मिक हिंसेचा बळी राणा प्रताप बैरागी : फोटो इंटरनेटवरून)
bangladesh-bairagi-murder हल्लेखोरांची संख्या आणि हत्येचे कारण शोधत असल्याचा दावा बांग्लादेश पोलिस करीत आहेत. मात्र, या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे दिसते. कारण, गेल्या पंधरवड्यात पाचव्या हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. बैरागी हा 45 वर्षांचा होता आणि तो केशबपूर उपजिल्ह्यातील अरुआ गावातील रहिवासी होता.
bangladesh-bairagi-murder सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास मणिरामपूरच्या वॉर्ड नंबर 17 स्थित कोपलिया बाजारपेठेत बैरागीवर हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या लोकांची धावपळ झाली आणि दरम्यान कोणीतरी पोलिसांना कळविले. तोपर्यंत बैरागी मृत्यूमुखी पडला होता. हल्लेखोरही गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले.
bangladesh-bairagi-murder दिपू चंद्र दास, अमृत मंडल, बजेंद्र बिस्वास आणि खोकन दास यांच्यानंतर आता राणा प्रताप बैरागीच्या हत्येमुळे बांग्लादेशातील अल्पसंख्यक हिंदूंच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.