गरजूंसाठी थंडीत जैन सेवा मंडळाची मायेची सेवा

05 Jan 2026 16:29:36
नागपूर,
Jain Seva Mandal जानेवारी महिना जैन समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा धार्मिक व आध्यात्मिक महिना मानला जातो. कडाक्याच्या थंडीत, वर्षाच्या सुरुवातीलाच सकाळी-सकाळी शहरातील विविध भागांत गरिब व गरजू नागरिकांसाठी चहा व बिस्किटांचे वितरण श्री जैन सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. इतवारी, शहीद चौक, महावीर नगर, वर्धमान नगर, इतवारी भाजी मंडी, भंडारा रोड, तसेच भ. श्री मुनिसुब्रतनाथ जैन मंदिर, भ. श्री सुमतिनाथ जैन मंदिर (रामदासपेठ) आणि भ. श्री अजीतनाथ जैन मंदिर (ओसवाल पंचायत) आदी ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.
 
Jain Seva Mandal
 
या पुण्यकार्याचे पुण्यार्जक पीयूष शाह, दिलीप गांधी, सुरेश डायमंड, मनोज जैन, धर्मचंद खजांची, दीपक नाहटा व श्रीपाल कोठारी आदी होते. श्री जैन सेवा मंडळ ही जैन समाजाची एकमेव प्रतिनिधी संस्था असून, गेल्या ८५ वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय आहे. Jain Seva Mandal संस्थेच्या वतीने श्री १००८ भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सवासारखे भव्य कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामंत्री डॉ. दीपक शेंडेकर, शरद मचाले व रवींद्र वोरा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास केयूर शाह, प्रशांत मानेकर, संजय टक्कामोरे, बरखा मुनोत, निलेश बेलसरे, चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0