सोनाली पवन ठेंगडी
family bonding importance नुकतीच एक बातमी समोर आली की, आता नवीन पिढी आपल्या समस्यांचे उत्तर एआयकडे मागत आहे. समस्येचे स्वरूप कोणतेही असले तरी एआय त्याला आपल्या परीने उत्तर देतोय म्हणे. ही बातमी वाचून मनात विचारांचे काहूर माजले. घरातील मुलांना आपल्या समस्यांविषयी एआयला विचारावे लागणे, तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणे हे फारच धक्कादायक आहे. असे का व्हावे, याचा विचार केला तर लक्षात येईल की, आज कुटुंबात आपआपसातील संवाद कमी झाला आहे.
आज घराघरातील चित्र family bonding importance डोळ्यासमोर आणले तर लक्षात येईल की, एकतर विभक्त कुटुंब आणि त्यातही सर्वांच्या स्वत:च्या वेळा ठरलेल्या. कोणी ऑफिस, कोणी शाळा, कॉलेज अशा व्यस्त दिनक्रमात अडकलेले. या सर्वांमध्ये कुठेतरी कुटुंबातील संवाद हरवतोय्. मुलगा दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे, यासाठी मोबाईलवर शोधाशोध करतो. आई किंवा वडील यांच्याशी बोलण्याची त्याला एकतर गरज वाटत नाही किंवा तशी सवयच लागलेली नाही. दोन्ही बाबतीत जबाबदार पालकच आहेत. कारण त्यांनी आपल्या घरातील वातावरण तसे तयारच केले नाही की, एकमेकांच्या समस्या कोणी बोलेल.
आपली भारतीय संस्कृती लोकांना जोडणारी आणि कुटुंबप्रधान अशी आहे. जेव्हा आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणतो तेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून कसे चालणार? सुधारणेची सुरुवात घरापासूनच व्हावी, असे म्हणतात. त्यामुळे कौटुंबिक सौहार्द निर्माण करण्यासाठी आधी कुटुंबीयांमध्ये संवाद सुरू व्हायला हवा. घरातील मुलांना आपल्या माणसांविषयी आदर आणि आपुलकी असावी. हे वातावरण निर्माण करण्यासाठी आपणही मुलांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा की, कोणतीही परिस्थिती असो आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमची कोणतीही समस्या असो आपण मिळून त्यावर तोडगा काढूया. अगदी मुलांच्या हातून चूक झाली तरी त्या परिस्थितीत त्याला सांभाळून कोसळण्यापासून वाचवले पाहिजे.
घरातील लोकांमध्ये संवाद निर्माण family bonding importance करण्यासाठी पुरातन काळापासून आपले पूर्वज सांगत आले की, भजन आणि भोजन हे कुटुंबातील लोकांनी एकत्र करावे. आताची स्थिती पाहता आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा तरी कुटुंबातील सर्वांनी एकत्र जेवण घेतले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त माननीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी जी पंचसूत्री दिली आहे, त्यात कुटुंब प्रबोधन हा विषय प्राधान्याने घेण्यात आला आहे. मुळात, आपण भारतीय कुटुंबाविषयी अतिशय संवेदनशील असतो. कोणी याला आपली कमजोरी म्हणेल पण, खरे पाहता हीच आपली शक्ती आहे. कोणत्याही परिस्थितीचासामना करण्यासाठी जेव्हा एक व्यक्ती उभी ठाकते तेव्हा तिची प्रतिकारशक्ती आणि एखादे कुटुंब एकोप्याने उभे राहते त्याची शक्ती यात फरक पडतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुटुंबातून वेगळे केले जाते तेव्हा त्या व्यक्तीचीच नव्हे तर कुटुंबाचीही शक्ती कमी होते. नोकरी, व्यवसायानिमित्त मुलांनी दुसरे घर करणे, ही व्यावहारिक अपरिहार्यता असते. पण, आपणहून कुटुंबाशी नाते तोडणे हा प्रकार समाज व्यवस्थेसाठी घातक ठरतो. कुटुंबापासून वेगळे होणाèया व्यक्तीमध्ये कायम एक असुरक्षिततेची भावना असते. ही भावना त्याला कधीही सक्षम बनू देत नाही. याउलट, कुटुंबाशी जोडलेली व्यक्ती, मग ती कोणत्याही निमित्ताने बाहेर असली तरी, सामाजिकदृष्ट्या आनंदी आणि सुरक्षित असते. तिच्या मनात ही भावना रूजविण्याचे काम कुटुंबातील वातवरण करत असते. म्हणून प्रत्येक कुटुंबातील पालकांनी आपल्या मुलांसोबत जेवणे, नाश्ता करणे, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा करणे, सर्वांनी एकत्र बसून टीव्हीवरील एखादा चांगला कार्यक्रम पाहणे, एखाद्या नातेवाईक किंवा आप्तेष्टांना घरी बोलावून त्यांच्यासोबत वेळ घालवणे, सामाजिक कार्यक्रमांना, नाटकांना एकत्र जाणे, मुलांना वेगवेगळ्या विषयांवर बोलते करणे हे सर्व करायला हरकत नाही. किंबहुना ही काळाची गरज आहे.
कुटुंबात आपल्या सर्व प्रश्नांची family bonding importance उत्तरे मिळतात, हे मुलांना समजल्यानंतर त्यांची भरकटण्याची शक्यता आपोआपच निवळते. कुटुंब, समाज यामध्ये मिसळण्याची त्यांची वृत्ती वाढीस लागते. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर नकळतपणे होतो आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचा धनी असणारा एक उत्तम नागरिकही बनू शकतो. नंतरच्या काळात तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी आपल्या अपत्याला स्वत:च्या समस्यांसाठी एआय किंवा तत्सम तंत्रज्ञानाकडे मदत मागण्याची गरजच भासणार नाही. यातून आपल्या कुटुंबातील मुल चांगले घडावे, ही प्रत्येकाची असणारी इच्छा फलद्रूप व्हायला मदत होईल. मात्र, त्यासाठी पालकांना थोडे प्रयत्न करावेच लागतील. त्यांच्या या प्रयत्नाचे चांगले फळ त्यांच्या अपत्याच्या जडणघडणीत दिसल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यायाने एक चांगला समाज घडविण्याच्या प्रक्रियेत हे आपले मोठे योगदान ठरेल.
7755938822