मानोरा,
heavy rainfall affected farmers तालुयातील उमरी महसूल मंडळातील पोहरादेवी येथे २९ ऑगस्ट ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने शेकडो घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पुरग्रस्त नागरिकांना शासनाकडून देण्यात येणारी खावटीची आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी पोहरादेवीतील नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देवून निवेदन दिले.

पोहरादेवी येथे ऑगस्ट-नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. मात्र, अद्याप एकाही बाधितास खावटीची आर्थिक मदत मिळालेली नाही. दिवाळीच्या दिवशी आंदोलनानंतर तहसीलदारांनी मदतीचे आश्वासन दिले होते. परंतु ते अपूर्णच आहे. या पार्श्वभूमीवर शेकडो पुरग्रस्त नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांना निवेदन देऊन २६ जानेवारीपर्यंत मदत न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनापासून तहसील कार्यालयावर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देताना जि. प. चे माजी अध्यक्ष अरविंद इंगोले, विजय पाटील, प्रकाश राठोड, ठाकुरसिंग चव्हाण, निळकंठ पाटील, शाम राठोड, विजय चव्हाण, खुशाल महाराज, हरिदास राठोड, देवानंद मोहिते, युवराज आडे, गजानन राऊत, राजेंद्र पिंगाणे, गणेश खंडारे, गोकुळ राठोड, भावराव चव्हाण, सुनील पडघने, संतोष रुनवाल, रमाबाई सावंत, सत्यभामा मनरवार, अनिता राठोड, केशव राठोड, कृष्णा पुसंडे, गजानन गायकवाड, प्रविण खोडके, दत्ता शिंदे, प्रेम पवार, अमोल खंडारे, प्रवीण जाधव, विलास काजळे, शे. फिरोज शे. कादर, चंदाबाई जाधव, शोभा सावंत, स्वाती अवधूत, सुशीला घुगे, पंजाब वानखडे आदीसह शेकडो महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.