चेन्नई,
Indian woman murdered in America अमेरिकेत मेरीलँडमधील एलिकॉट सिटीमध्ये राहणारी भारतीय महिला निकिता गोडिशा हिची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निकिताचा मृतदेह तिच्या माजी प्रियकर अर्जुन शर्माच्या अपार्टमेंटमध्ये आढळला होता. अमेरिकन पोलिसांनी सांगितले की, हत्या घडल्यावर अर्जुन भारतात पळून गेला होता. या प्रकरणात इंटरपोल आणि तामिळनाडू पोलिसांनी संयुक्त तपास करून सोमवारी (५ जानेवारी) अर्जुनला तामिळनाडूत अटक केली.
निकिता डेटा आणि स्ट्रॅटेजी विश्लेषक म्हणून काम करत होती आणि अमेरिकेत बराच काळ राहत होती. अर्जुनने अमेरिकन पोलिसांना तक्रार दाखल केली होती की निकिता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपासून बेपत्ता आहे. परंतु, पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला असता अर्जुनच्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह रक्ताने माखलेला आणि अनेक चाकूने वार केलेला आढळला.
अमेरिकेतील पोलिसांनी सांगितले की, अर्जुनने स्वतः पोलिसांशी संपर्क साधला होता, मात्र त्याच दिवशी तो भारतात पळून गेला. इंटरपोलने अमेरिकन पोलिस एजन्सींच्या सहकार्याने आणि स्थानिक तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने त्याचा माग काढला आणि त्याला अटक केली. भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे की पीडितेच्या कुटुंबाशी संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. हे प्रकरण दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करत असून, निकिताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तपास चालू आहे.