नोएडा,
Korean citizen dies नोएडामध्ये एका कोरियन पुरूषाचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपी महिलेची अटक केली आहे. सेक्टर १५० मधील एटीएस पायस हायवे सोसायटीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मणिपुरी रहिवासी लुंजियाना पमाई या महिलेनं दक्षिण कोरियातील ४० वर्षीय डक ही युह यांच्यावर चाकूने वार केला. युह हा कोरियाच्या चेओंगजू शहरातील रहिवासी असून, नोएडामध्ये सेक्टर १४२ येथील अॅडव्हेंट टॉवरमधील एका लॉजिस्टिक्स कंपनीचा शाखा व्यवस्थापक होता. दोघे दीड वर्षांहून अधिक काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
पोलीसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोघांनी फ्लॅटमध्ये मद्यपान केले आणि त्यानंतर वाद झाला. रागाच्या भरात महिलेने युहच्या छातीत चाकूने वार केला. गंभीर अवस्थेत युहला रुग्णवाहिकेतून कसाना येथील रुग्णालयात नेले गेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना घटनास्थळाची माहिती दिली. पोलीस तपासात असेही समोर आले की, घटनेवेळी दुसरे कोणीही उपस्थित नव्हते. आरोपी महिलेने घटनानंतर शेजाऱ्यांचे दरवाजे ठोठावले,
पण मदत मिळाली नाही. तसेच तपासात तिच्या मोबाईल कॉल डिटेल्स आणि रेकॉर्ड तपासले जात आहेत. प्राथमिक चौकशीत वादाचे कारण उघडकीस आले असून, महिलेने सांगितले की युहने तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर आरोपी महिलेने रुग्णाला औषध दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला, मात्र तोपर्यंत युहचा मृत्यू झाला होता. अतिरिक्त डीसीपी सुधीर कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेची अटक केली असून, तपास सुरू आहे.