वारंवार 'लैंगिक इच्छेची' मागणी... मग काढायचा 'प्रायव्हेट फोटो'

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
लातूर,
Nilanga sexual harassment case लातूरच्या निलंगा परिसरात १६ वर्षीय अल्पवयीनने घरच्या घरी फास लावून आत्महत्या केली, अशी खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी उघड झाली. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उभे केले आहेत.
 
 

Nilanga sexual harassment case  
घटनेनुसार, मृतक पीडितेवर काही काळापासून ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रास देण्यात येत होता. आरोपी प्रथमेश शंकर अकोले, जो छायाचित्रकार आहे, त्याने लव्ह रिलेशनशिपचा छळ करून तिचा विश्वास जिंकला आणि विवाहाची प्रलोभने देत वारंवार अत्याचार करीत राहील . तिचे आक्षेपहार्य फोटो त्याने काढले त्यानंतर फोटो घेऊन सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत सतत त्रास दिला.पीडितेचे पालक लहानपणीच निधन झालेले होते, त्यामुळे तिच्या काकांचे मुले तिची काळजी घेत असे. तरीही या सततच्या मानसिक त्रासामुळे तिला शेवटी आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले.
 
 
या घटनेनंतर Nilanga sexual harassment case  निलंगा पोलिस स्टेशनमध्ये आरोपीच्या विरोधात भारतीय दंडसंहितेतील तसेच POCSO कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्या करण्यास प्रवृत्त करणे, नाबालिगेवर लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलिंग यासारख्या गंभीर कलमांतर्गत तपास सुरू आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष टीम लावली आहे.ही घटना समाजासाठी सतर्कतेचा इशारा आहे. पालक, शिक्षक, प्रशासन आणि समाजाने मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर, धमक्या देणे आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी तंत्रज्ञानाबाबत जाणीव ठेवणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, मुलींच्या संरक्षणासाठी पुढील उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.