कर्करोग रुग्णांसाठी जलौका चिकित्सा अमृततुल्य

05 Jan 2026 14:22:19
नागपूर,
cancer patients कर्करोग रुग्णांच्या पूरक उपचारांमध्ये आयुर्वेदातील जलौका चिकित्सा प्रभावी ठरत असल्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ व विश्वकुंभ आयुर्वेदिक चिकित्सालयाचे संचालक डॉ. संतोष पुसदकर यांनी सांगितले. कर्करोग उपचारांदरम्यान उद्भवणारी वेदना, सूज, दाह, रक्तसंचय आणि त्वचेवरील जखमा यांवर जलौका चिकित्सा उपयुक्त ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
cancer patients
 
डॉ. पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांसाठी सुरक्षित व नियंत्रित स्वरूपात आयुर्वेदिक जलौका चिकित्सा राबविली जाते. जलौकांच्या लाळेत असणारे जैवसक्रिय घटक रक्ताभिसरण सुधारतात, दाह कमी करतात तसेच वेदनांवर दिलासा देतात. ही चिकित्सा अ‍ॅलोपॅथिक उपचारांना पूरक ठरून रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास सहाय्यक ठरते. cancer patients डॉ. पुसदकर तसेच डॉ. शरयू विजापुरे, डॉ. आंचल ढगे आणि डॉ. ज्ञानेश्वरी मुळे यांनी रुग्णांना तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच जलौका चिकित्सा घेण्याचे आवाहन केले.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0