ट्रेकिंगची आवड ठरली घातक; ओमानमध्ये भारतीय महिलेचा मृत्यू

05 Jan 2026 16:08:15
मस्कत,  
indian-woman-dies-in-oman ओमानची राजधानी मस्कत येथे राहणाऱ्या एका भारतीय महिलेचा ट्रेकिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केरळमधील थझावा येथील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय शारदा अय्यर ही ओमान एअरच्या माजी व्यवस्थापक होरी. ती दिवंगत कृषी शास्त्रज्ञ आर. डी. अय्यर आणि रोहिणी अय्यर यांच्या कन्या तसेच प्रसिद्ध मल्याळम गायिका चित्रा अय्यर हिची बहीण आहे.
 
indian-woman-dies-in-oman
 
वृत्तानुसार, २ जानेवारी रोजी ओमानच्या अल दाखिलियाह गव्हर्नरेटमधील जेबेल शम्स परिसरात शारदा अय्यर ट्रेकिंग करत असताना ही दुर्घटना घडली. हा परिसर उंच कड्या आणि अत्यंत कठीण भूभागासाठी ओळखला जातो, त्यामुळे ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी तो धोकादायक मानला जातो. indian-woman-dies-in-oman मात्र, तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा अय्यर हिचे पार्थिव ओमानहून केरळमध्ये आणले जात असून ७ जानेवारी रोजी थझावा येथील तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ती भारतात आली होती आणि २४ डिसेंबर रोजी पुन्हा ओमानला परतली होती. तिच्या वडिलांचे ११ डिसेंबर रोजी निधन झाले होते.
दरम्यान, गायिका चित्रा अय्यर यांनी सोशल मीडियावर भावनिक शब्दांत बहिणीला श्रद्धांजली वाहिली आहे. indian-woman-dies-in-oman इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये तिने आपल्या दुःखाची भावना व्यक्त करत, “माझ्या लाडक्या धाकट्या बहिण, तू खूप वेगाने पुढे धावत आहेस… पण मी तुला गाठेन… नक्कीच… लवकरच, असा माझा शब्द आहे,” असे हृदयस्पर्शी शब्द लिहिले आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांसह चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे.
Powered By Sangraha 9.0