गृहस्थाश्रमाच्या यात्रेसाठी वरवधू परिचय मेळावा पहिली पायरी : पालकमंत्री भोयर

05 Jan 2026 18:41:27
वर्धा,
Pankaj Bhoyar, सध्याच्या काळात विवाह जुळणे वा जुळवणे फार कठीण झाले आहे. धावपळीत या कार्यासाठी फारसा कोणालाही वेळ नाही. अशा परिस्थितीत ब्राह्मण सभेच्या वतीने ३५ वर्षांपासुन वरवधू परिचय मेळावा घेत आहेत ही बाब कौतुकाची आहे. माता पित्यांचे ऋण फेडण्यासाठी, गृहस्थाश्रमाच्या सुखी यात्रेसाठी व कुळ परंपरेच्या संवर्धनासाठी उपवर वधूंचा परिचय हा प्रथम पायरीचा दगड ठरतो. ते काम ब्राह्मण सभा करते आहे. ब्राह्मण सभेकरिता सभागृहाची मागणी करण्यात आली. शहरातील मध्यवस्तीत तुम्ही जागा शोधा. आपण त्यासाठी मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
 
 

Pankaj Bhoyar,
वर्धा ब्राह्मण Pankaj Bhoyar, सभेच्या वतीने रविवार ४ रोजी स्थानिक सत्यनारायण बजाज वाचनालयात सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राह्मण उपवर वधू राज्यस्तरीय परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीव लाभे होते तर भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, डॉ. किरण खेर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपिठावर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलास कुळकर्णी, उपाध्यक्ष सतीश बावसे, प्रकाश परसोडकर, सचिव महेश देशपांडे, नागपूर येथील ब्राह्मण सेवक संघाचे अध्यक्ष रमाकांत मुळे, राम वखरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी संजीव लाभे Pankaj Bhoyar, म्हणाले की, केवळ भौतिक किंवा तांत्रिक प्रगतीने एखादे राष्ट्र विकसनशील ठरत नाही तर त्या राष्ट्राची कुटुंब व्यवस्था हे त्या समाजाचे आणि राष्ट्राचे मूलभूत एकक ठरते. उपवर वधू मेळावा आपल्याला आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी उपलब्ध असे एक पवित्र माध्यम आहे. शिक्षण आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे जरी महत्त्वाचे वाटत असले तरी ते लग्नाच्या पवित्र बंधनाला कमकुवत करणारे ठरू नये, असे मार्गदर्शन लाभे यांनी केले.वैशाली येरावार म्हणाल्या की, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना आपण आपल्या मूळ रूढी आणि परंपरा विसरू नये. पाश्चिमात्यांप्रमाणे स्वातंत्र्याच्या नावाखाली जर आपण या परंपरांचा र्‍हास करू लागलो तर खर फत राहण्याचे ठिकाण राहील पण घराचे घरपण हरवेल. कुटुंब टिकते ते समाधान आणि तडजोडीच्या पायावर. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण होईलच असे नाही, पण एकमेकांना समजून घेणे क्वचित प्रसंगी कधी माघार घेऊन प्रेमाने पुढे जाणे हाच कौटुंबिक जीवनाचा शाश्वत आनंद असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात विलास कुळकर्णी यांनी ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच ब्राह्मण सभेला हकाचे सभागृह असावे याकरिता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मदत करावी, अशी मागणी केली. संचालन स्वाती देेशपांडे यांनी केले तर आभार महेश देशपांडे यांनी मानले.मेळाव्याला विदर्भातीलच नव्हे तर राज्य आणि मध्यप्रदेशातील जवळपास ४०० मुलांची तर २५० मुलींची नोंदणी झाली. कार्यक्रमाला विजय देशपांडे, विठ्ठल व्यवहारे, प्रफुल्ल व्यास, विदर्भ भोई समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरे, जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्था संस्थापक सचिव तसेच विद्यमान कार्यलक्षी संचालक ओंकार धावडे, निळकंठ शेष, भंडारा येथील मंगला गुंजीकर आदी उपस्थित होते.यशस्वीतेकरिता मधुकर जोशी, अमोल जोशी, वसंत देशपांडे, श्याम परसोडकर, अश्विनी कुळकर्णी, मुग्धा जोेशी, सोनाली ठकरे, संगीता पागे, शुभांगी फाले आदींनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0