मुंबई,
Ranpati Shivray Swari Agra भव्य रंगमंच, झगमगती रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि मंत्रमुग्ध करणारे वातावरण… या सगळ्यांच्या साक्षीने मराठी चित्रपटप्रेमींना एक ऐतिहासिक अनुभव मिळाला. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या लेखन-दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी चित्रपटातील खास प्रसंगाचे भव्य सादरीकरण नुकतेच रंगभूमीवर करण्यात आले.
भरजरी वस्त्र, आकर्षक जिरेटोपी, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला भवानी तलवार आणि घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार रंगमंचावर अवतरताच उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड जल्लोष उसळला. शिवकालीन इतिहासातील अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाने कोरलेला अध्याय चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, धैर्य, नेतृत्व आणि रणनिती प्रभावी रीतीने प्रदर्शित केले जाणार आहे. नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र महाराजांच्या रूपात दिसणार असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी उत्सुकतेने प्रतिक्षा केली आहे.
चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ गीताचे Ranpati Shivray Swari Agra सादरीकरण सध्या चाहत्यांसाठी मोठ्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हे गीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून अवधूत गांधी व अमिता घुगरी यांचा स्वरसाज गीताला लाभला आहे. तसेच संगीतकार अवधूत गांधी व मयूर राऊत यांनी गीताला प्राणफुला संगीतबद्ध केले आहे. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिककडे सोपवण्यात आली आहे.या ऐतिहासिक चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनील परमार आणि मुरलीधर छतवानीय असून सहनिर्मात्यांची जबाबदारी रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा यांनी सांभाळली आहे. वर्ल्ड वाईड वितरण पॅनोरमा स्टुडिओजमार्फत होणार असून, जागतिक स्तरावर मराठी इतिहासाची भव्य मांडणी प्रेक्षकांसमोर पाहायला मिळणार आहे.चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, शिवकालीन इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील साहस, कर्तृत्व आणि रणनिती यांचा प्रभावी अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटातून नक्कीच मिळणार आहे.