सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

05 Jan 2026 13:10:03
नागपूर,
Savitribai Phule Jayanti सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पत संस्था, हनुमान नगर यांच्या वतीने गृहिणी समाज सभागृह, हनुमान नगर येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य, संचालक मंडळ, महिला बचत गट तसेच हनुमान नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
nagpur
 
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, पंडित बच्छराज विद्यालयाचा अर्चना जोशी उपस्थित होत्या. मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पहाडे व उपाध्यक्षा शारदा क्षत्रिय यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. Savitribai Phule Jayanti त्यानंतर खुशाली कोडापे हिने ‘माय भवानी’ हे सुंदर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पुढे प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत समारंभ पार पडला.
 
यानंतर मंजुषा बनसोड यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित स्वरचित गीत सादर केले. तसेच अंजली जोशी व मेधा भांडारकर यांनी प्रभावी एकपात्री नाटक सादर केले. दीप्ती तपासे हिने प्रासंगिक देवीचा गोंधळ सादर करून कार्यक्रमात रंग भरला. याशिवाय मंजुषा बनसोड व सहकाऱ्यांनी सामाजिक संदेश देणारे पथनाट्य सादर केले. Savitribai Phule Jayanti यानंतर प्रमुख अतिथी अर्चना जोशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकत संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
 
कार्यक्रमाचे संचालन आरती तांदुळकर यांनी केले तर खुशाली कोडापे यांनी आभारप्रदर्शन केले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. Savitribai Phule Jayanti या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून हनुमान नगरचे नगर संघचालक ज्ञानेश्वर बालपांडे, संस्थेचे माजी अध्यक्ष गिरीश हरकरे, गृहिणी समाजाच्या उपाध्यक्षा नीलिमा टेंभेकर, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव मोहन झरकर, भाजपा महिला आघाडीच्या जयश्री गभणे, विकास खळतकर, सदानंद शेटे, तसेच संचालक मंडळाचे सदस्य सुनिल तायडे, प्रवीण पांडे, श्रीकांत अलोणी, प्रकाश गभणे, संजय पिड्डी व सतीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले.
सौजन्य: संदीप तिजारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0