पुण्यात शिवाजीनगरमधील प्राचीन मंदिरात चोरी

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
पुणे,
Theft at an ancient temple in Pune पुण्यातील शिवाजीनगर भागात एका प्राचीन मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. मांढरदेवी काळूबाईच्या मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि देवीच्या मूर्तीवरील सुमारे ३० हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट लंपास केला. ही चोरी शनिवारी सकाळी मंदिर उघडल्यानंतर उघडकीस आली. मंदिर प्रशासनाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक अजित बढे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
 
 
 
Theft at an ancient temple in Pune
पुण्यातील मध्यवर्ती भागातील मंदिरात चोरी झाल्याने परिसरातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला असून नागरिकांनी रात्रीच्या गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, पिंपरी-चिंचवड शहरातून आणखी एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे. शिवाजी चौकात शनिवारी रात्री रिक्षात बसू न दिल्याच्या वादावरून एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी त्याच्याकडून रक्कम लुटल्याची माहिती आहे.