सरकारचा 'मास्टर प्लान' सुरू शेतकऱ्यांच्या काळजीला 'गुडबाय'

05 Jan 2026 14:46:47
मुंबई,
Mahavedh project राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता प्रत्यक्षात सुरू झाला असून, बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानाचा धोका कमी करण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी जोरात सुरू आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने महावेध प्रकल्पांतर्गत सुरू केलेल्या या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, पावसाचे प्रमाण, तापमान, आद्रता, वाऱ्याचा वेग यासारखी माहिती वेळेत मिळणार आहे.
 

Mahavedh project 
शेतीतील अनिश्चितता Mahavedh project आणि हवामानाच्या बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली असून, यावर मात करण्यासाठी राज्यातील महसूल मंडळांमध्ये २,३२१ स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित केली गेली आहेत. एकूण २,५८४ महसूल मंडळांपैकी या केंद्रांची स्थापना झाली असून, पुढील टप्प्यात ग्रामपंचायत स्तरावरही २५,५२२ केंद्रे उभारली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या Mahavedh project मदतीने या केंद्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता आणि रोबोटिक्स यांसारख्या उपकरणांचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी आणि कापणीसाठी वेळेवर माहिती मिळण्यास मदत होईल. याशिवाय महत्त्वाचे कृषी प्रकल्प जसे अ‍ॅग्रीस्टॅक, महा-अ‍ॅग्रीटेक, क्रॉपसॅप आणि महा-डीबीटी या योजनांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यातही मदत होणार आहे.अकोला जिल्ह्यात सध्या ५२ महसूल मंडळांमध्ये केंद्रे कार्यरत असून, ५३४ ग्रामपंचायतींपैकी ४८३ ठिकाणी नवीन केंद्रांसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वेळेवर सल्ला मिळेल आणि त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होईल तसेच उत्पादनात वाढ होईल.स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे शेतकरी आता अधिक स्मार्ट आणि सुरक्षित पद्धतीने शेती करू शकतील. बदलत्या हवामानाचा अंदाज अचूक मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल आणि शेतीतील जोखीम लक्षणीयरीत्या कमी होईल. हा प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी एआयच्या माध्यमातून आधुनिक कृषी क्रांतीची सुरुवात ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0