दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत आठवणींचा उत्सव साजरा

06 Jan 2026 15:05:44
नागपूर,
SDD Hindu Girls' School श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथील सन २००३–०४ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्या जुन्या, सुंदर आठवणी पुन्हा अनुभवण्यासाठी विशाखा विरखरे आणि तिच्या सुमारे ५० मैत्रिणींच्या कल्पनेतून ‘आठवणींचा आनंदोत्सव’ हा उपक्रम साकार झाला.
 
SDD Hindu Girls
 
या कार्यक्रमाला देशभरातून तसेच परदेशातूनही माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आमच्या शाळेची पाळेमुळे जगभर पसरली आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. SDD Hindu Girls' School शाळेतील ते दिवस पुन्हा अनुभवता यावेत, यासाठी प्रार्थनेपासून ते वर्गातील तासांपर्यंतचा अनुभव जिवंत करण्यात आला. त्या काळातील वर्गशिक्षिका रेखा फडणवीस यांनी पुन्हा एकदा १० अ वर्गखोलीत बसून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
 
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणही झाले. माजी विद्यार्थिनी नेहा रामेकर इंदूरकर यांनी सादर केलेल्या भारुडाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. SDD Hindu Girls' School या कार्यक्रमाला स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र फडणवीस, अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस, माजी शिक्षिका रेखा फडणवीस, जामदार, घुई, शिंदे यांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थिनींचे स्वागत केले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य: माया बामनोटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0