शेतातील विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळला

06 Jan 2026 19:10:41
नागभीड, 
leopard-was-found-dead : तालुक्यातील कोथुळणा येथील शेतशिवारातील एका शेतकर्‍याच्या विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना सोमवार, 5 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
 
 
 
chand
 
 
 
कोथुळणा येथे बाळकृष्ण रामटेके यांच्या मालकीच्या शेतात विहीर असून, या विहिरीत बिबट मृतावस्थेत पडून असल्याचे आढळून आले. मागील काही दिवसांपूर्वी विहीर पडून मृत पावल्याने तो सडल्या अवस्थेत होता. यामुळे दुर्गंधी येत होती. या शेतातून बुधा मडावी हे जात असताना त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. यावेळी विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळून आल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून मृत बिबटला विहिरीतून बाहेर काढले.
 
 
मृत बिबट एक ते दीड वर्षाचा असून, त्याचे वजन 45 किलो होते, अशी माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. शेतातील विहिरीला कठडे नसल्याने बिबट शिकारीच्या शोधात आला असता तो या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत बिबट्याला नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून जाळण्यात आले. घटनास्थळला ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सहाय्यक उपवनसंरक्षक महेश गायकवाड, नागभीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी भेट देऊन पाहणी केली.
Powered By Sangraha 9.0