नागपूर,
textile commissioner आयकर विभागाच्या 2003 बॅचच्या अधिकारी वृंदा मनोहर देसाई यांची भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत मुंबई येथे वस्त्रोद्योग आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूरच्या कन्या असलेल्या वृंदा देसाई यांचे शालेय शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल व सोमलवार हायस्कूलमध्ये झाले आहे. श्री रामदेवबाबा कमला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स शाखेत अभियांत्रिकी पदवी संपादन केली. केंद्रीय लोकसेवा परीक्षेत 2003 साली अ.भा. स्तरावर 80 वा क्रमांक मिळाला. त्यांची भारतीय महसूल सेवा (आयकर) या सेवेत निवड झाली. नागपुरातील एनएडीटीत 16 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची नागपूरलाच सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. देशात विविध ठिकाणी त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर केंद्रीय सचिवालय सेवा प्रतिनियुक्तीवर पाच वर्षांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयात संचालक (प्रसारण) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांना 2024 साली भारत सरकारच्या संयुक्तसचिव पदासाठी एम्पॅनलमेंट मिळाले. त्या संयुक्तसचिव (चित्रपट), परकीय व्यापार महासंचालनालयात अतिरिक्तमहासंचालक होत्या.
वृंदा या दिवंगत अॅड. मनोहर व उषा देसाई यांच्या कन्या असून, त्यांच्या ‘देसाई मोटर स्कूल’ने नुकतीच 50 वर्षे पूर्ण केली. त्यांचे पती गौरव दयाल आयएएस (2004 बॅच) हे सध्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधीकरण नवी मुंबई येथे अध्यक्ष आहेत.textile commissioner नागपूरसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, शहरातील एका कन्येला देशपातळीवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वस्त्रोद्योग आयुक्तालयांतर्गत नागपुरात एकात्मिक वस्त्र व परिधान रचना केंद्रात त्या कार्यरत आहेत.