बिरसा मुंडा जनजाती गौरव यात्रेचे हिंगणघाटात स्वागत

06 Jan 2026 20:55:42
हिेंगणघाट, 
birsa-munda-tribal-pride-journey : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त जनजाती गौरव यात्रेचे येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
 
 
 
ij
 
 
 
जनजाती गौरव यात्रेला १ जानेवारी रोजी धारणी, मेळघाट येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांच्या राष्ट्रभक्ती, सामाजिक जागृती, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व जनजाती समाजाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अभाविपने केला आहे.
 
 
यात्रा हिंगणघाट येथे पोहोचली असता विश्व हिंदू परिषदेतर्फे यात्रेचे स्वागत केले. या प्रसंगी संदेश उरकुडे (अमरावती जिल्हा विस्तारक), जय शिंदे (वर्धा नगर विस्तारक), रितेश बोभाटे (हिंगणघाट नगर सहमंत्री), बादल लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. वेळी वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, वर्धा जिल्हा विहिपं मंत्री शरद कोणप्रतिवार, हिंगणघाट तालुका संघचालक विनोद नांदुरकर, कार्यवाह पंकज आत्राम, हिंगणघाट प्रखंड विहिपं मंत्री देवा वाघमारे, सुरज वरठी, गौरव तांबोळी तसेच अभाविपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनजाती समाजाच्या सन्मानासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी ही यात्रा प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यत केला.
Powered By Sangraha 9.0