आम्ही नागपूरला केले आधुनिक शहर

06 Jan 2026 21:57:35
नागपूर,
devendra-fadnavis : नागपूर शहराचा चहुबाजूने विकास झाल्याने जनतेला शहराचा झालेला स्पष्ट दिसून येत आहे. पायाभूत सुविधांमध्ये नागपूर शहर सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून पुढच्या दशकातील वेगाने विकसित होणारे नागपूर शहर असेल असे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. नागपूरला आम्ही आधुनिक शहर केले आहे. आता देशातील सर्वोत्तम शहर करण्याची गॅरंटी देवाभाऊ देत असल्याने महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 

cm 
 
 
 
 
भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री बोरगाव चौक येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सभेला भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, मनपा निवडणूक प्रभारी संजय भेंडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, आ.परिणय फुके आदी उपस्थित होते. तर दुसरी सभा तिरंगा चौक, येथे झाली. यावेळी सभेत आमदार मोहन मते,विष्णू चांगदे,भोजराज डुंबे आदी उपस्थित होते. तिसरी सभा रात्री ९ वाजता त्रिमूर्ती नगर चौकात झाली. सभेत आमदार प्रवीण दटके,आमदार संदीप जोशी,रितेश गावंडे,अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, दिलीप दिवे आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र पुढे म्हणाले, आम्ही केवळ विकासाचे राजकारण करीत असल्याने निवडणूक प्रचारातदेखील त्याच मुद्द्यांवर आमचा भर आहे. परंतु विरोधकांकडे कुठलीही निती, योग्य नियत नाही. विकास कामे करण्याची ताकद आमच्या नगरसेवकांच्या पाठीशी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी नगरसेवकांच्या मागे उभा असल्याने शहराच्या विकास कामांची गॅरंटी देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप
 
 
मुख्यमंत्र्यांनी दावा केला की चांगल्या शिक्षणसंस्था जेथे असतात तेथेच उद्योग येतात. आम्ही देशातील सर्व मोठ्या शिक्षणसंस्था नागपूर शहरात आणल्या आहेत. मिहान व एमआयडीच्या माध्यमातून एक लाखांहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे. आणखी दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याने पुन्हा एक लाख नवीन रोजगारांची निर्मिती आहे.
 
 
नागपुरात अनेक वर्ष सत्तेवर असलेल्यांनी केवळ राजकारणच केले होते. निवडणूका आल्या की झोपडपट्टी पट्टेवाटपाची घोषणा व्हायची, परंतु त्याची अंमलबजावणी कधीच होत नव्हती. मात्र आता आम्ही झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करून दाखविले.
 
 
दोन तीन वर्षांत नागपूर टँकरमुक्त
 
 
चोबीस बाय सातची योजना देशात सर्वात पहिले नागपुरात राबविण्यात आल्यानंतर आता भागात पाणीपुरवठा होत आहे. पूर्वी उन्हाळ्यात विविध वस्त्यांमध्ये पाण्यासाठी मोर्चे काढावे लागत होते. सध्याच्या घडीला रिंग रोड बाहेरील वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरविले जाते. पाईप लाइन्स टाकण्याचे काम सुरु असल्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षांत नागपूर शहर टँकरमुक्त होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
गोरेवाड्यात दोन सफारी व पंचतारांकित हॉटेल
 
 
पश्चिम नागपुरचा असताना पहिल्यांदाच गोरेवाडा झू पार्क उभारण्याची मागणी केली होती. आता गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आणखी दोन सफारी सुरू होणार असून पंचतारांकित हॉटेलदेखील उभारण्यात येणार आहे. तेथे २५ लाख पर्यटक भेट देतील, असे नियोजन गोरेवाडा येथे केल्या जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0