नागपूर,
ticket checking मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सघन तिकीट तपासणी मोहिमांच्या माध्यमातून जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या वर्षभराच्या कालावधीत राबविलेल्या प्रभावी तिकीट तपासणीमुळे नागपूर विभागाला कोटी ५७लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत तिकीटविरहित प्रवासाची १ लाख ६१ हजार ९१४ प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांतून ७ कोटी २२ लाख भाडे तसेच ४ कोटी ४४ लाख अतिरिक्त दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे, अनियमित प्रवासाच्या १ लाख ५२ हजार २९२ प्रकरणांमध्ये ४ कोटी ८ लाख भाडे ३ कोटी ९१ लाख अतिरिक्त दंड़ वसूल करण्यात आला. याशिवाय, बुकिंग्य न केलेल्या सामानाच्या २ हजार ३०१ प्रकरणांमध्ये ४ ८७ हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली.ticket checking अशा प्रकारे तिकीट तपासणी अंतर्गत एकूण ३ लाख २९ हजार ८३९ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, त्यातून २० कोटी ५७ लाख ७८ हजार ३३१ उत्पन्न नागपूर विभागाला मिळाले आहे.