गुरुवारपासून गडचिरोली अंध कल्याण शैक्षणिक सप्ता

06 Jan 2026 18:09:31
गडचिरोली, 
blind-welfare-educational-week : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 12 जानेवारी दरम्यान 36 वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन येथील अभिनव लॉनवर करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत दिली.
 
 
 
gad
 
 
 
या सप्ताहात महाराष्ट्रातील 15 अंध विद्यालयातील इयत्ता 1 ली ते 10 वी चे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी समस्त गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक संस्था, व्ययक्तिक दानदाते यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवास, निवास, भोजन व बक्षिसे याकरीता सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे. गडचिरोलीवासीयांसाठी मनोरंजनासाठी 10 जानेवारी रोशनी म्युजिकल ग्रृप नागपूर यांचा आर्केस्टचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
या शैक्षणिक सप्ताहाच उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दृष्टीन संघाचे राज्य अध्यक्ष रघुनाथ बारड राहणार आहेत. स्वागताध्यक्ष मैत्री परिवार गडचिरोलीचे अध्यक्ष निरंजन वासेकर राहणार आहे. तर अतिथी म्हणून अधिक्षक अभियंता विक्रम मेश्राम, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे महासचिव डी. पी. जाधव, माऊली सेवा मंडळ नागपूरचे सुहास खरे, रीना पाटील आदींची उपस्थिती रहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
 
 
पत्रपरिषदेला डी. पी. जाधव, सुहास खरे, भोजराज पाटील, निरंजन वासेकर, प्रमोद धात्रक, अश्‍विनी भांडेकर, अविनाश चडगुलवार आदींची उपस्थित होती.
Powered By Sangraha 9.0