तीन गोतस्करांवर कारवाई; एकास अटक

06 Jan 2026 19:25:29
गोंदिया,
cattle-smugglers : सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव ते गिरोला दरम्यान ६ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कत्तलखान्याकडे गोवंश नेणार्‍या तीन आरोपींवर कारवाई केली. यातील एक आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या कारवाईत १३ गोवंशांची सुटका करण्यात आली.
 
 
 
kl
 
 
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना घटेगाव ते गिरोला या मार्गाने जनावरांची कत्तलखान्याकडे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान एका संशयास्पदरित्या येणार्‍या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. वाहन थांबताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला ताब्यात घेतले. तसेच वाहनातील २ लाख ६० हजार रूपये किमतीच्या १३ गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन जप्त करून आरोपी आशिष पाखमोडे (३५), दुर्गेश हिरदयालसिंग राजपूत (३५) व मयूर उर्फ मर्डर सर्व रा.मुरमाडी ता. लाखनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Powered By Sangraha 9.0