तलवारीने केक कापणारा गजाआड

06 Jan 2026 19:21:13
गोंदिया,
cake-cut-with-a-sword : सार्वजनिक ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करून त्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर टाकणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ६ जानेवारी रोजी अटक केली. लवकुश रमेश गजभिये (२८, रा. परसटोली, छोटा गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
 
 
 
cake
 
 
 
आरोपीने आपला वाढदिवस सार्जनिक ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास तलवारीने केक कापून साजरा केला. तसेच त्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर टाकले. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने, लोकांमध्ये दशहत निर्माण करण्यासाठी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याची कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी तलवार जप्त करून आरोपीला अटक केली. आरोपीवर कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार राजू मिश्रा, पोलिस हवालदार महेश मेहर, पोलिस शिपाई राकेश इंदूरकर, संतोष केदार यांनी केली.
Powered By Sangraha 9.0