अकोल्यात हिदायत पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला

06 Jan 2026 14:48:01

Hidayat Patel was attacked
 
 
अकोला, 
Hidayat Patel was attacked काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा हल्ला त्यांच्या मूळ गावी अकोट तालुक्यातील मोहाळा येथे झाला. हल्लेखोरांनी पटेल यांच्या पोटावर तसेच मानेवर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर तातडीने हिदायत पटेल यांना जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0