समुद्रपूर,
khursapar-forest : तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात १२ महिन्यांपासून मुकामी असलेल्या एक वाघीण, तीन पिल्लं आणि एक वाघ अशा ५ वाघांच्या कुटुंबियांच्या मुतसंचारमुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. त्या वाघ परिवाराचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी आ. समिर कुणावार यांनीही पाठपुरावा केला. दोन दिवसांपुर्वी पाचही वाघांचा बंदोबस्त करण्याचा आदेश धडकला. त्यामुळे खुर्सापार जंगलातील वाघ कुटुंब जेरबंद करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असुन वनविभाचे अधिकारी कर्मचारी अॅशन मोडवर आले आहेत.
आ. समिर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे सततच्या पाठपुरावाने आधी एका वाघाला तर आता वाघीण व तिच्या तिन्ही पिल्यांना अशा संपूर्ण वाघ परिवाराला जेरबंद करण्याचा आदेश वनविभागाला प्राप्त झाली असून आत पाचही वाघ जेरबंद करण्याची जबाबदारी वनविभागाकडे आली आहे. उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वाघ परिवाराला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची चमू अॅशन मोडवर आली आहे. जंगल परिसरात शेकडो स्ट्राप कॅमेर्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. २ ड्रोन कॅमेरे सुद्धा रोज जंगल परिसरात घिरट्या घालत आहे. ६० च्यावर अधिकारी व कर्मचारी वाघांच्या मागावर असून या ५ वाघांना जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर वाघांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे त्यातील कुटुंब प्रमुख वाघाला जेरबंद करण्याची परवानगी ३ महिन्यापुर्वीच मिळाली आहे.
त्या परवानगीला तीन महिने लोटूनही तो वाघ वनविभागाच्या हाती अद्याप लागला नाही. हा वाघ इतका चतूर आहे की त्याला पकडण्याची भनक लागताच तो नागपूर जिल्ह्यातील जंगलात पलायन करीत आहे. त्यामुळे नागपूर व वर्धा वनविभागाला सयुत मिशन राबविण्याचे आदेश मिळाले होते. आ. कुणावार हे सुरुवातीपासूनच या वाघांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असुन त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी फोनवर चर्चा करून वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे हिंगणघाट येथे आले असता त्यांना या ५ वाघांसंबधी अवगत करून पाचही वाघांना तातडीने जेरबंद करण्याचे संबंधितांना निदर्शन देण्याची मागणी निवेदनातून केली होती. वाघ नागपूर जिल्ह्यातील जंगलात पलायन करीत आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील वाघाला नागपूर हद्दीत पकडण्याचा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. मात्र, आ. कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे नागपूर व वर्धा जिल्ह्यातील वनविभागाच्या चमुने सयुत कारवाई करण्याचा तोडगा काढण्यात आला होता. दोन्ही चमुचे काम सुरू असताना रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही संबंधित विभागाने वाघीण व तिच्या तिन्ही पिल्याना जेरबंद करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे आता वनविभागाची चमू गिरड खुर्सापार परीसरात दहशत निर्माण करणार्या पाचही वाघांना जेरबंद करण्याचा मार्ग मोकळा झाला असून वाघासह कुटुबियांना जेरबंद करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.