कोट्यवधींची लाच, ६०हून अधिक बैठका; ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी पाकची विनंती

06 Jan 2026 16:15:09
वॉशिंग्टन, 
pak-request-us-to-stop-operation-sindoor ऑपरेशन सिंदूर संदर्भात अमेरिकेतील अधिकृत कागदपत्रांमधून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, त्यातून पाकिस्तानची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर उघडी पडली आहे. जम्मू–काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर ते ऑपरेशन सिंदूर सुरू होईपर्यंत आणि भारत–पाकिस्तानदरम्यान चार दिवस चाललेल्या तणावाच्या काळात, पाकिस्तानने अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
pak-request-us-to-stop-operation-sindoor
 
उपलब्ध माहितीनुसार, पाकिस्तानी राजनयिकांसह संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अमेरिकेत ५० पेक्षा अधिक बैठका घेण्याची मागणी केली होती. pak-request-us-to-stop-operation-sindoor या बैठका अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी, खासदार तसेच प्रभावशाली मीडिया संस्थांशी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. अमेरिकेतील यूएस फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन ऍक्ट (FARA) अंतर्गत नोंदी दर्शवतात की, वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी उच्चायुक्तांनी ६० हून अधिक बैठका घडवून आणण्यासाठी ई-मेल, फोन कॉल्स आणि प्रत्यक्ष भेटी घेतल्या होत्या. या सर्व प्रयत्नांचा उद्देश भारताविरोधात अमेरिकेवर दबाव निर्माण करणे हाच होता. ऑपरेशन सिंदूरमुळे हादरलेला पाकिस्तान, भारतीय कारवाई थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर अक्षरशः गयावया करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
या काळात पाकिस्तानने केवळ अमेरिकन खासदारांनाच नव्हे, तर पेंटागन (अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय), स्टेट डिपार्टमेंटमधील वरिष्ठ अधिकारी आणि नामांकित पत्रकारांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. चर्चांमध्ये काश्मीर प्रश्न, प्रादेशिक सुरक्षा, सीमावर्ती द्विपक्षीय संबंध तसेच रेअर अर्थ मिनरल्ससारख्या विषयांचा समावेश होता. अमेरिकेची सहानुभूती मिळवण्यासाठी पाकिस्तानने मोठा आर्थिक डावही खेळल्याचे उघड झाले आहे. pak-request-us-to-stop-operation-sindoor नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, पाकिस्तानने वॉशिंग्टनमधील एका लॉबिंग फर्मला सुमारे ५ मिलियन डॉलर्स, म्हणजेच जवळपास ४५ कोटी रुपयांचा मोबदला दिला होता. या लॉबिंगचा फायदा तत्कालीन ट्रम्प प्रशासनालाही झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, पाकिस्तानने ‘जेव्हलिन ऍडव्हायझर्स’मार्फत काम करणाऱ्या ‘सेडेन लॉ एलएलपी’ या संस्थेसोबत करार केला होता. या करारानंतर काही आठवड्यांतच तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे स्वागत केले होते. pak-request-us-to-stop-operation-sindoor ट्रम्प यांची मर्जी मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारसही करण्यात आली होती, तसेच व्यापार आणि व्यवसायाशी संबंधित विविध आमिषेही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर किती मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0