वडनेर,
madhuri-varwatkar : अक्षर क्रांती फाउंडेशन व राम गणेश गडकरी प्रतिष्ठान प्रायोजित दुसरे अक्षर साहित्य संमेलन नागपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग सभागृहात झाले. यावेळी मांडगांव येथील कवयित्री माधुरी वरवटकर यांच्या ‘मनातला सोनचाफा’ या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ साहित्य संघचे अध्यक्ष प्रदीप दाते, संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कथाकार व ज्येष्ठ साहित्यिक वसंत वाहूरकर, स्वागताध्यक्ष वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, आदी उपस्थित होते.
माधुरी वरवटकर यांच्या मनातला सोनचाफा या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्रसिद्ध कवयित्री सुप्रिया माळी लातूर यांची असुन पाठ राखण ब्लर्ब प्रसिद्ध कवी समीक्षक प्रभाकर तांडेकर यांचे मिळाले. कवयित्री माधुरी वरवटकर यांनी तरुण भारत चे आभार मानले. वर्धा जिल्ह्यातील मांडगाव येथील माधुरी वरवटकर या पदविधर असून कुटुंब आणि शेतीकाम सांभाळून कविता लिहिल्या. विविध कविता संमेलन सहभाग घेत अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. विशेष म्हणजे, सर्व प्रथम ‘तरुण भारत’ने त्यांच्या अनेक कविता प्रकाशित केल्या. या प्रेरणादायी प्रवासातून कवयित्री माधुरी वरवटकर यांनी कवितासंग्रह लेखनात तरुण भारत या दैनिकाचा मोठा वाटा असल्याचे सांगून आभार मानले.