मंगरूळनाथ येथे अवैध जुगारावर धाड

06 Jan 2026 18:23:10
वाशीम,
raid-on-illegal-gambling : मंगरूळनाथ शहरालगत असलेल्या मानोरा रस्त्यावरील एका शेतात आंब्याच्या झाडाखाली ५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अवैध जुगार खेळणार्‍यावर पोलिसांनी धाड टाकून १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
 
jnk
 
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानोरा रस्त्यावरील शेत शिवारात आंब्याच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस विभागाला मिळाली. त्यानुसार मंगरूळनाथ उपविभागीय पोलिस विभागाने धाड टाकली असता त्याठिकाणी १३ जण आठ दुचाकी गाड्या व एक चार चाकी वाहन नगदी १ हजार व इतर साहित्यासह एकूण १४ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळावरुन जुगार खेळणारे पसार होण्यात यशस्वी झाले असून, यामध्ये शहरातील प्रतिष्ठीत लोकांचा समावेश असल्याचे घटनास्थळावरुन जप्त केलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनावरुन दिसून येते.
 
 
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक किशोर शेळके, एपीआय काळे, पोलिस अंमलदार राम राऊत, रफिक मांजरे, शकील मुन्नी वाले, प्रमोद वानखडे, अनंता डोळसे यांनी केली पुढील तपास पोलिस विभाग मंगरूळनाथ हे करीत आहे.
Powered By Sangraha 9.0