रिहान अली ठरला आमदार श्रीचा मानकरी

06 Jan 2026 19:56:05
वर्धा,
rehan-ali : युवा एकता क्रीडा मंडळाच्या वतीने बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोशिएशन विदर्भ व बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोशिएशन वर्धाच्या संयुत वतीने केसरीमल कन्या शाळेच्या प्रांगणावर सोमवारी सायंकाळी आयोजित आमदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी रिहाण अली ठरला. तसेच उप विजेताचा किताब अमर ठाकरे याने तर बेस्ट पोझरचा मानकरी ओम बडवाईक राहिला. बक्षीस वितरण समारोहाला प्रसिद्ध सिने अभिनेता गोविंदाची खास उपस्थिती होती.
 
 
 
kjk
 
 
 
५० ते ६० किलो वजन गटात ५७ स्पर्धेक सहभागी झाले हाते. त्यामध्ये रिहान अली प्रथम आला. व्दितीय लकी गोधणे, तृतीय शकुर शेख, ६० ते ६५ किलो गटात १६ स्पर्धक सहभागी होते. प्रथम प्रज्वल उरकांदे, द्वितीय राहुल बन्सोड, तृतीय सोनका सलाम, ६५ ते ७० किलो गटात ११ स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये अमर ठाकरे प्रथम, व्दितीय निरंजन संगितवार, तृतीय विक्रम कोहचरे, ७० ते ७५ किलो गटात १३ स्पर्धक होते. प्रथम सुरज मसराम, द्वितीय निखील हिवसे, तृतीय मयुर सुरकार तर पाचव्या खुला ७५ किलो वरील गटात गटात ६ स्पर्धक सहभागी झाले होते.
 
 
प्रथम ओम बडवाईक, द्वितीय गौरव पिस्तुलकर, तृतीय पुरस्कार तेजस कडूकर यांनी पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. समीर मेघे, आ. राजेश बकाणे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी खा. रामदास तडस, माजी आ. सुधाकर कोहळे होते तर विशेष अतिथी म्हणून कडकनाथ अग्रो वर्ल्ड नाशिकचे संदीप सोनवणे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट, नपचे माजी उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, भाजपचे जिल्हा महामंत्री अशोक कलोडे, प्रशांत बुर्ले, समाजसेवक सुधाकर साटोणे, भाजपाचे गटनेते विलास आगे, नगरसेवक प्रदीप ठाकूर, सुनिल चावरे, सोहनसिंग ठाकूर, कैलास राखडे, प्रदीप तलमले, सचिन होले, शंकर शेंडे, अशिष कुचेवार, पृथ्वी शिंदे, संजय जाधव, बंटी गोसावी, नौशाद शेख आदी उपस्थित होते.
 
 
संचालन इब्राहिम बश आजाद यांनी केले तर आभार डॉ. मदन इंगळे यांनी मानले. शरीर सौसष्ठ स्पर्धेसाठी सिने अभिनेता गोविंदाची उपस्थितीत वर्धेकरांचे आकर्षण राहिली. गोविंदाने आपल्या स्टाईल ने काही संवाद साधत आपल्या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य देखील करीत प्रेक्षकांची मने जिंकली. गोविंदाने चित्रपट सृष्टीतील काही क्षणांना उजळा दिला. त्याला वर्धेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
Powered By Sangraha 9.0