महिलांचा कल याच देशातील स्पर्म डोनरकडे? एक व्यक्ती तर १९७ मुलांचा बाप

06 Jan 2026 13:22:47
कोपनहेगन,  
sperm-donors जगातील अत्यंत सुंदर, सुरक्षित आणि शांत देशांमध्ये गणल्या जाणाऱ्या डेन्मार्कची सध्या एका वेगळ्याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. या देशात जन्माला येणाऱ्या दर १०० मुलांपैकी किमान एक मूल स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून जन्माला येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्पर्म डोनेशनच्या बाबतीत डेन्मार्क आज जगातील सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरला असून, ही संपूर्ण उद्योगव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
 
 
sperm-donors
 
डेन्मार्कमधील स्पर्म बँका सध्या जगभरातील अनेक देशांना स्पर्म पुरवठा करत आहेत. विशेषतः निळे डोळे, गोरा वर्ण, उंच बांधा आणि चांगली शारीरिक तंदुरुस्ती असलेले डोनर यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. याच कारणामुळे जगभरातील महिला स्पर्मसाठी डेन्मार्ककडे प्राधान्याने पाहतात आणि परिणामी डेन्मार्क हा जगातील सर्वाधिक स्पर्म डोनेशन करणारा देश बनला आहे. मात्र, या झपाट्याने वाढणाऱ्या उद्योगावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. डेन्मार्कमधील एका स्पर्म डोनरने तब्बल १९७ मुलांना जन्म दिल्याची बाब समोर आली असून, या व्यक्तीच्या जनुकीय तपासणीत कॅन्सरशी संबंधित गंभीर म्यूटेशन आढळून आले आहे. ही बाब उघड होताच वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या डोनरच्या स्पर्ममधून जन्माला आलेल्या अनेक मुलांमध्ये जन्मजात कॅन्सरचा धोका आढळून आला असून, काही मुलांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. sperm-donors विशेष म्हणजे, या व्यक्तीचे स्पर्म जगातील सुमारे १४ देशांमधील महिलांनी वापरले होते, त्यामुळे या प्रकरणाचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवू लागला आहे. संबंधित डोनरने २००५ साली स्पर्म डोनेशनला सुरुवात केली होती आणि जवळपास १७ वर्षे तो नियमितपणे स्पर्म डोनेट करत होता. मात्र, नंतरच्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या पेशींमध्ये कॅन्सरचे म्यूटेशन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या स्पर्ममधून जन्मलेल्या मुलांमध्येही तोच जनुकीय दोष आढळून येऊ लागला, ज्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डेन्मार्कनंतर युरोपमधील इतर देशांमधूनही मोठ्या प्रमाणावर स्पर्म डोनेशन सुरू असून, हा उद्योग सध्या सुमारे १.३ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचला आहे. sperm-donors डेन्मार्कमधून जगभरात स्पर्मची निर्यात होत असून, विशिष्ट शारीरिक गुणधर्म असलेल्या डोनरची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र, या प्रकरणामुळे स्पर्म डोनेशन उद्योगातील नियम, तपासणी प्रक्रिया आणि नैतिकतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Powered By Sangraha 9.0