मानोरा,
subsidized-housing-construction : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या इंझोरी ह्या गावातील पात्र नागरिकांना शासनाकडून मंजूर झालेल्या विविध घरकुलाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर वर्ष उलटूनही थकलेले हप्ते मिळेना झाल्याने या गावातील सैरभैर झालेल्या व कर्जबाजारी झालेल्या नागरिकांनी आज पंचायत समिती प्रशासनाला निवेदन देऊन उपरोक्त समस्या सोडविण्याची मागणी केली.
मोदी आवास, प्रधाममंत्री आवास, शबरी आवास, रमाई आवास अशा विविध योजनेतून शासनाकडून घरकुल मिळाले आहे. उपरोक्त घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला म्हणून घरकुलचे बांधकामे सुरू केले. परंतु गेल्या एक वर्षापासून घरकुलचे हप्ते थकलेले आहेत. त्यामुळे कर्ज काडून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने घरकुलधारकावर उपासमारीची पाळी आली आहे. येत्या आठ दिवसात जर थकीत हप्ते मिळाले नाही तर इंझोरी येथील लाभार्थी शिवसेना पदाधिकारी (उबाठा) गटाच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा गटविकास अधिकारी मानोरा यांना निवेदन देऊन देण्यात आला आहे.