आजनसरा,
saurabh-agarwal : पोलिस अधीक्षक पदाचे सुत्र सांभाळल्यानंतर सौरभ अग्रवाल यांनी संत भोजाजी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांच्या मार्गदर्शनात सचिव शिवदास पर्बत, विश्वस्त श्रावण काचोळे सेवार्थ दवाखान्याचे व्यवस्थापक डॉ. संदीप लोंढे यांच्या हस्ते एस.पी सौरभ अग्रवाल यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी देवस्थान द्वारा संचालित असलेल्या निर्माल्यापासून धूपबत्ती प्रकल्प, सेवार्थ दवाखाना, प्रसादालय, वृद्धाश्रम या बद्दल माहिती जाणून घेतली, पुरणपोळी प्रसाद निर्मिती व स्वयंपाक शेडची पाहणी केली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरण पोळीचा प्रसाद आपण पहिल्यांदाच बघत असल्याचे अग्रवाल म्हणाले. पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि थेट जनतेशी संवाद साधणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. संस्थेद्वारे सुरू असलेल्या सामाजिक प्रकल्पांबाबत व देवस्थानच्या वाटचालीस पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी शुभेच्छा दिल्या.