मोसमातील सर्वाधिक कमी तापमान

06 Jan 2026 15:09:54
नागपूर,
lowest temperature nagpur आकाशातून ढगांची गर्दी कमी होताच किमान तापमानात पुन्हा घसरण झाली आहे. नागपूर गारठले असून थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरसह विदर्भात थंडीची पसरल्याने मोसमातील सर्वाधिक कमी म्हणजे नागपूर ७.६ अंशांवर तर गोंदियात तापमान ७.० अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पारा सरासरीपेक्षा खाली राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
 

thandicha para 
 
 
रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका
मंगळवारी सकाळपासून थंडीचा अनुभव यायला सुरुवात झाली होती. सायंकाळनंतर थंडी होती. तर रात्री गार वार्‍यामुळे स्वेटर,जॉकेट, मफलर घालण्याची वेळ आली. मुख्यत: हवामानात सतत बदल जाणवत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कधी कडाक्याची थंडी तर काही ठिकाणी ढगाळ आणि दमट वातावरण असे संमिश्र चित्र गत चार पाच दिवसात पाहायला मिळाले.
हिमालयाकडून येणार्‍या थंड वार्‍यांच्या बदलत्या प्रवाहाचा परिणाम नागपूरसह विदर्भ आणि होत आहे. पुढील २४ तासांत विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. नागपूरसह विदर्भात आणि महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव वाढला आहे. कडाक्याची थंडी जाणवत असताना सर्वात कमी गोंदियात किमान तापमान ७ अंशांवर पोहोचले आहे. तर नागपूरमध्ये ७.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
काही दिवसांच्या तुलनेत ही लक्षणीय
तापमानात अवघ्या २४ तासात चार ते पाच अंशाने घट झाली असून प्रामुख्याने विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत ही घट लक्षणीय असून, पहाटेच्या वेळी तीव्र गारठा जाणवत आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीसह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्येही थंडीचा प्रभाव वाढताना दिसत आहे.lowest temperature nagpur वर्ध्यात अमरावती ९.२ तर ब्रम्हपुरी येथे अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरीत शहरातही किमान तापमानाचा पारा दहा ते १५ अंशाच्या आसपास आहे.
...
Powered By Sangraha 9.0