नेपाळमधील मशिदी तोडफोडीवरून अशांतता; भारतीय सीमा सतर्कतेवर, VIDEO

06 Jan 2026 13:42:22
बिरगंज, 
unrest-in-nepal-over-mosque  नेपाळमधील पर्सा आणि धनुषा धाम जिल्ह्यांमध्ये धार्मिक वादातून परिस्थिती गंभीर बनली आहे. पर्सा जिल्ह्यातील बिरगंज शहरात धनुषा येथील एका मशिदीत तोडफोड करण्यात आल्याची आणि त्यांचा पवित्र ग्रंथ जाळल्याची बातमी पसरताच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सुरुवातीला शांततेत सुरू झालेले आंदोलन काही वेळातच हिंसक वळणावर गेले. त्यातच सोशल मीडियावर धार्मिक आशय असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने तणाव आणखी वाढला.
 
unrest-in-nepal-over-mosque
 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने बिरगंजमध्ये कर्फ्यू लागू केला असून भारत–नेपाळ सीमा पूर्णपणे सील करण्यात आली आहे. मैत्री पूल तसेच इतर सर्व सीमा तपासणी नाके बंद ठेवण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाने (एसएसबी) अतिरिक्त जवान तैनात केले असून ये-जा करणाऱ्यांची कडक तपासणी सुरू आहे. दगडफेक झाल्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला. unrest-in-nepal-over-mosque या कारवाईत काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. सुरक्षेचा वेढा अधिक कडक करण्यासाठी डॉग स्क्वॉडही तैनात करण्यात आली आहे. एसएसबी व इतर सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, केवळ मैत्री पुलावरच नव्हे तर सहदेवा, महदेवा, पनटोका, सिवान टोला आणि मुशहरवा या सीमा भागांतही गस्त वाढवण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जात आहे. दरम्यान, धनुषा जिल्ह्यातील कमला नगरपालिकेतही तणावपूर्ण वातावरण आहे. येथेही मशिदीतील तोडफोड व कुराण जाळल्याच्या बातमीने संताप उसळला. मुस्लिम समाजाकडून झालेली निदर्शने हिंसक झाली, तर हिंदू संघटनांनीही प्रतिक्रिया दिल्याने परिस्थिती अधिक चिघळली. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून चौकशी सुरू आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
बिरगंज व आसपासच्या भागातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे नेपाळमध्ये काम करणारे अनेक भारतीय कामगार मायदेशी परतू लागले आहेत. भारतात परतणाऱ्या राकेश या नागरिकाने सांगितले की, बिरगंजमधील सर्व दुकाने व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. परिस्थिती पूर्ववत झाल्यावरच पुन्हा कामासाठी परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी धनुषा जिल्ह्यातील कमला नगरपालिका अंतर्गत सखुवा मनार गावात एका मशिदीत तोडफोड आणि पवित्र ग्रंथ जाळल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर बिरगंजमध्ये तणाव पसरला. unrest-in-nepal-over-mosque आंदोलनादरम्यान हिंदू संघटनांनी आपल्या देव-देवतांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी झाल्याचा आरोप केला, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. अखेर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
Powered By Sangraha 9.0