वणा नदीतून वाळूचा उपसा, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

06 Jan 2026 21:46:18
हिंगणघाट, 
sand-extraction : येथील वणा नदीतून उपसा करून दोन ट्रॅटरने वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून वाळूसह ट्रॅटर जप्त केले. ही कारवाई ५ रोजी डंकिन येथील वणा नदीजवळ करण्यात आली असून १३ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
j
 
 
 
हिंगणघाट पोलिस गस्तीवर असताना वणा नदीतून वाळूचा उपसा करून ट्रॅटरद्बारे अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वणा नदीजवळ पोलिसांनी सापळा रचला. दोन ट्रॅटर येताना दिसताच पोलिसांनी वाहनं थांबवून पाहणी केली. वाहतुकीचा परवाना विचारला असता तो त्यांच्याकडे नसल्याचे लक्षात येताच एम. एच. ३२ पी. २२७६ आणि एम. एच. ३२ टी. सी. ०२५ क्रमांकाचे ट्रॅटर, ट्रॉली, वाळू, मोबाईल असा १३ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संदीप राऊत (३४) रा. लोटन चौक हिंगणघाट, अब्दुल शाहीद अब्दुल गफार, परमेश्वर कुळसंगे (२९) रा. कानापूर, व्यंकटेश बोपचे रा. शहालंगडी आणि सचिन साखरकर रा. संत तुकडोजी वार्ड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0