तभा वृत्तसेवा
उमरखेड,
vijay-hardafkar : नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विजय हरडफकर यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
उमरखेड नगरपरिषदेत सध्या पक्षीय बलाबल पाहता जनशक्ती पॅनेलचे 17 तर भारतीय जनता पार्टीचे 9 नगरसेवक आहेत. भाजपाच्या नगरसेवकांमध्ये एकमताने विजय हरडफकर यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली.
दरम्यान, नगरपरिषद नप अध्यक्षपदी जनशक्ती पॅनेलच्या तेजश्री संतोष जैन यांनी 1 जानेवारी रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. नव्या नगरपरिषद कार्यकाळात सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात समन्वय व लोकहिताचे निर्णय अपेक्षित असल्याचे मत नगरवासीयांतून व्यक्त होत आहे.
विजय हरडफकर यांच्या नेतृत्वात भाजपा नगरसेवक शहराच्या विकासात्मक मुद्यांवर प्रभावी भूमिका मांडतील, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.